शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खेमानी नाल्याच्या योजनेचे काम संथपणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 05:06 IST

उल्हासनगर पालिका :३६ कोटींचा खर्च, कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याची राजकीय पक्षांची मागणी

उल्हासनगर : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी खेमानी नाल्याचे पाणी अडवून त्यावर प्रक्रिया करून खाडीत सोडण्याची योजना अत्यंत संथपणे सुरू आहे. यामुळे ही योजना वादात सापडून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी विविध पक्षांकडून केली जात आहे. १० ते १२ कोटी खर्चाच्या योजनेवर ३६ कोटी खर्च केला जात आहे.

खेमानी नाला सेंच्युरी रेयॉन कंपनीजवळ उल्हास नदीला मिळतो. ज्या ठिकाणी नाला नदीला मिळतो, तेथून एमआयडीसी पाणी उचलते. पाण्यात प्रदूषणाचा काही अंश शिल्लक राहत असल्याने लाखो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यातूनच खेमानी नाल्याचा प्रवाह बदलण्याची मागणी झाली. उच्च न्यायालय व हरित लवादात नदीच्या प्रदूषणाची याचिका दाखल झाल्यावर लवादाने पालिकांना १०० कोटींचा दंड ठोठावला. तसेच उल्हासनगर महापालिकेला खेमानी नाल्याचा प्रवाह बदलण्यास सांगितले.राज्य सरकारने ३६ कोटींच्या निधीतून खेमानी नाला योजनेचे काम सुरू केले. सांडपाणी उल्हास नदीकिनारी व सेंच्युरी कंपनीजवळ मोठ्या विहिरीत आणून पंपिंगद्वारे शांतीनगर येथील केंद्रात सोडावे. तेथे प्रक्रिया झाल्यावर वालधुनी नदीत सोडण्याची योजना आहे.दंडाच्या माहितीबाबत अधिकारीच अनभिज्ञमात्र, योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याचा ठपका तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी ठेवत रोज ५० हजारांचा दंड ठोठावला. त्यानंतर, दंडाचे काय झाले, याची माहिती कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांच्याकडे उपलब्ध नाही. आतातर रिपाइंसह पीआरपी, राष्ट्रवादी व इतर पक्षांनी खेमानी नाल्याच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली असून हा विषय महासभेत आणला आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर