शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

डोंबिवलीच्या संघ स्वयंसेवकांनी जाणून घेतले सोशल मीडियाचे धोके

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 19:31 IST

सध्याच्या परिस्थितीत समाजमनावर सोशल मिडीयाचा प्रचंड प्रभाव आहे. कोणतीही घटना अथवा विचार हा सोशल मिडियावर पाठवला जातो आणि तो तितक्याच वेगाने पसरला जातो, अथवा बहुतांश वेळा जाणूनबुजून पसरवलाही जातो.

 डोंबिवली- सध्याच्या परिस्थितीत समाजमनावर सोशल मिडीयाचा प्रचंड प्रभाव आहे. कोणतीही घटना अथवा विचार हा सोशल मिडियावर पाठवला जातो आणि तो तितक्याच वेगाने पसरला जातो, अथवा बहुतांश वेळा जाणूनबुजून पसरवलाही जातो. मग त्या बातमी मागची सत्यता तपासून बघितली जातेच असेही नाही. मात्र आलेले संदेश जसेच्या तसे पुढे पाठवण्याआगोदर त्यातील तथ्यता, संदर्भ यांसह परिणामकारकता सगळयाचा आवर्जून विचार करावा असे आवाहन प्रख्यात भागवताचार्य विवेक घळसासी यांनी संघ स्वयंसेवकांना केले.‘सोशल मीडिया आणि स्वयंसेवकाची कर्तव्ये’ या विषयावर त्यांनी डोंबिवलीतील स्वयंसेवकांना बुधवारी मार्गदर्शन केले. सगळयांच्याच जिव्हाळयाचा विषय असल्याने सकाळी ७ वाजता घेण्यात आलेल्या बौद्धिकासाठी १६० अबालवृद्ध स्वयंसेवक आवर्जून उपस्थित होते. घळसासी पुढे म्हणाले की, अनेक खाजगी संस्था, सोशल मीडियावरील आपल्या पोस्ट्सचा अभ्यास करून समाजातील कलेक्टिव्ह ट्रेंड्सचा वापर राजकीय अथवा आंतराष्ट्रीय पातळीवर स्ट्रॅटेजीकल मूव्हमेंटसाठी कसा करता येईल यासंबधी कार्य करतात. याचा प्रत्यय गेल्या काही वर्षात अधिक प्रमाणात आला आहे आणि यापुढेही येईल. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांची निवडणूक हे सर्वात मोठे उदाहरण असल्याचे ते म्हणाले.गेल्या काही वर्षांत भारतात, हिंदू धर्माच्या वाढीसाठी पूरक अशा राजकीय आणि सामाजिक वातावरणामुळे भारत जगासमोर मोठ्या ताकतीने उभा राहत आहे. अशावेळी या मिडीयाचा वापर करून, हिंदू धमार्तील दुगुर्णांचा गैरवापर करणा-यांचा एक गट सुनियोजितपणे कार्यरत आहे, हे त्यांनी उदाहरण देऊन सांगितले. उदाहरणादाखल त्यांनी नुकत्याच घडलेल्या अनेक सामाजिक घडामोडी या सोशल मीडियाच्या प्रभावामुळे कशा घडल्या हे स्पष्ट केले.अशा परिस्थितीत एक स्वयंसेवक म्हणून आपले कर्तव्य काय, याबाबत अत्यन्त स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. सोशल मिडियावर आपण काय फॉरवर्ड करतो याकडे कटाक्षाने लक्ष देणे महत्वाचे आहे. विशेषत: स्वयंसेवकांनी मत व्यक्त करताना समाजातील इतर मंडळी आपले मत हे संघाचे मत आहे असेच समजतो, त्यामुळे स्वयंसेवकांची जबादारी अधिक वाढते.वर्तमानपत्र अथवा इतर ठिकाणी वाचलेली माहिती चुकीची असेल तर त्यावर आपण संदर्भ देऊन त्यावर योग्यप्रकारे मतप्रदर्शन करायला हवे. आपण ईमेल द्वारे आपले मत मुद्देसूदपणे मांडले पाहिजे. कोणतीही गोष्ट शेअर करताना, तिची सत्यता पडताळून पाहणे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच ती शेअर करण्याची आवश्यकता आहे का हे सुद्धा बघायला हवे. ब-याचदा ‘सोशल मिडियावर मौन पाळणे’ हा ही एक उत्तम उपाय असू शकतो. आपल्या शहरात लेखकांचा अथवा सोशल मिडियावर अधिकाधिक प्रभावी मांडणी करणा-या स्वयंसेवकांचा एक गट बनवावा, असेही त्यांनी आवाहन केले. अनेक उदाहरणे देऊन, सोशल मीडिया आणि स्वयंसेवकाची कर्तव्ये हा विषय त्यांनी अत्यन्त प्रभावीपणे मांडल्याची प्रतिक्रिया स्वयंसेवकांनी व्यक्त केली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSocial Mediaसोशल मीडियाnewsबातम्या