शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

... तर तुमचा मनोज शेलार करावा लागेल, शिवसेनेच्या शिक्षण सभापतींना चिठ्ठीतून धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 19:04 IST

उल्हासनगर महापालिका शाळा इमारतीची दुरावस्था झाली असून एकेकाळी १२ हजारांपेक्षा जास्त असणारी मुलांची पटसंख्या ४ हजारावर आली

ठळक मुद्देयाप्रकारने हादरलेल्या सभापती शुभांगी बहेनवाल यांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे यांना झालेला प्रकार सांगितला. तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिली.

उल्हासनगर : महापालिका शाळा बाबत जास्त चौकशी कराल तर, तुमचा मनोज शेलार करावा लागेल, असे धमकीचे पत्र शुक्रवारी शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बहेनवाल यांच्या महापालिका कार्यालयाच्या टेबलखाली मिळाल्याने एकच खळबळ उडाली. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व शिवसेना नेते धनंजय बोडारे यांनी आक्रमक होत अश्या प्रवृत्तीला ठेचावे लागेल असा इशारा देऊन पालिकेने चौकशी करण्याची मागणी केली.

उल्हासनगर महापालिका शाळा इमारतीची दुरावस्था झाली असून एकेकाळी १२ हजारांपेक्षा जास्त असणारी मुलांची पटसंख्या ४ हजारावर आली. तसेच मुलांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण मंडळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे पत्र शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बहेनवाल यांनी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना दिले. तशी बातमी शुक्रवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होऊन चर्चेचा विषय बनली. दरम्यान शुक्रवारी शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बहेनवाल ह्या महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेल्या असता, त्यांच्या टेबलच्या काचेखाली एक कागद ठेवल्याचे दिसले. शाळांची जादा चौकशी करालतर , तुमचे मनोज शेलार करावे लागेल. अशी धमकी त्या पत्रात होती. 

याप्रकारने हादरलेल्या सभापती शुभांगी बहेनवाल यांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे यांना झालेला प्रकार सांगितला. तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिली, असे त्या म्हणाल्या. राजेंद्र चौधरी व धनंजय बोडारे यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेऊन शिवसेनेच्या सभापतीला धमकावल्या बाबत नाराजी व्यक्त करून महापालिका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे सभापतींच्या कार्यालयात कोण कोण गेले होते. याचा शोध घेऊन असे भ्याड कृत्य करणाऱ्याला शिवसेना धडा शिकविणार असल्याचा इशारा दिला. एका वर्षांपूर्वी मनसे विध्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी शिक्षण मंडळ बाबतची माहिती मागितली होती. यातून त्यांच्यावर हल्ला होऊन हल्ला करण्याचा मुख्य सूत्रधार महापालिकेचा एक कर्मचारी निघाला होता. 

गोरगरीब मुलांसाठी लढणे चुकीचे आहे का? 

शहरातील गोरगरीब व गरजू मुले महापालिका शाळेत शिक्षण घेत असून त्यांना सर्व सुखसुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढतो. असे लढणे चुकीचे आहे का? असा प्रश्न शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बहेनवाल यांनी केला. शिक्षण विभागाच्या उपायुक्त प्रियांका राजपूत यांना झालेला प्रकार सांगितला असून त्यांनी प्रशासकीय स्तरावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे बहेनवाल म्हणाल्या. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरShiv SenaशिवसेनाMuncipal Corporationनगर पालिका