शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर समजेल खरा भ्रष्टाचाराचा सरदार कोण? जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार

By अजित मांडके | Updated: July 22, 2024 17:18 IST

Jitendra Awhad : ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते.

ठाणे : शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावे, आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत. मग, समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे ते! अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. ईडी, सीबीआय वापरून पक्ष कसे फोडले, ७०  हजार कोटींचा आरोप कोणावर झाला होता, आणि सध्या ते कुठे आहेत? हे त्यांनी जाहीर करावे. शरद पवार या नावावर टीका केल्याशिवाय आपले अस्तित्व दाखवता येत नाही, हे अमित शहा यांनाही उमगले आहे. याच शहा यांनी इलेक्ट्रोल बाँड,  सीबीआय यावरही कधीतरी बोलावे, असेही ते म्हणाले.

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोड सेफ्टी नावाचा प्रकारच सध्या अस्तित्वात राहिलेला नाही. सुमारे ८००-८०० पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन होणार कसे? मग, हिट अँड रन होणार नाही तर काय? वरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार, अशा स्थितीत सामान्य नागरिक कसे काय सुरक्षित राहणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

हल्ली पीए, कार्यकर्ते पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवावा किंवा नोंदवू नये, असे आदेश देत आहेत. पुणे, वरळीत राजकीय हस्तक्षेप झाला होता. आता मुलुंड प्रकरणात गुन्हाच दाखल केला जात नव्हता. एकीकडे कोणाला एमपीडीए लावायचा, कुणाला तुरूंगात टाकायचे, यासाठी फोन केले जातात. चौकशी पारदर्शक होत नाही. गुन्हेगार वाचविले जातात. मग, काही होत नाही म्हणून मग्रुरी येते आणि गुन्हे वाढत जातात. हे थांबलं पाहिजे.     विशाळगड आणि गजापूर दंगलीबाबतही आव्हाड यांनी शासन - प्रशासनाला खडे बोल सुनावले. स्थानिकांनी तहसीलदार, पोलीस प्रशासनाला कळवूनही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही. त्यामुळे स्वत:ला शिवभक्त म्हणवून घेणाºयांनी आधी गडावर जाऊन धिंगाणा घातला आणि त्यानंतर गजापूरात पोलीस अधीक्षकांच्या समोरच लूटमार केली. विशाळगडावरील वास्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मशिदीशेजारी मुक्काम केला होता आणि त्यांच्या नावाने दंगल पसरविली जात आहे. ही दंगल पसरवणारे कसले शिवभक्त ते तर दरोडेखोर आहेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांची भेट घेत आहेत, याबाबत विचारले असता, शरद पवार हे देशातील सर्वात प्रगल्भ आणि परिपक्व नेते आहेत. ते मानव हिताचे राजकारण करीत आले आहेत. पवारांनी जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. पण, गेले दोन वर्षे या सत्ताधाऱ्यांनी दोन जाती एकमेकांशी भिडवल्या. त्यात यश न आल्याने त्यांनी आता हिंदू-मुस्लीम दंगल भडकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAmit Shahअमित शाह