शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर ५४ हजार शेतकऱ्यांची पेन्शन बंद?, केवायसीची अंतिम मुदत बुधवारपर्यंत

By सुरेश लोखंडे | Updated: August 29, 2022 09:08 IST

PM Kisan Sanman: केंद्र शासनाने पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची पेन्शन तब्बल तीन टप्प्यांत मिळत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : केंद्र शासनाने पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची पेन्शन तब्बल तीन टप्प्यांत मिळत आहे. पात्र, ठरलेल्या काही शेतकऱ्यांचे निधन झाले आहे. हयातीचा दाखला आणि अन्य माहितीसह ई-केवायसी जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली नाही. आता ३१ ऑगस्टपर्यंत केवायसीची ही कमी भरून न काढल्यास या शेतकऱ्यांची बुधवारपासून पेन्शन बंद होणार आहे.हयातीची माहिती आवश्यक हयात असल्यासह विविध स्वरूपाची माहिती जिल्ह्यातील या पेन्शन लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसीच्या स्वरूपात नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी ३१ जुलैपर्यंत शेवटची मुदत होती. त्यात आणखी मुदतवाढ देण्यात आली हाेती. आतापर्यंत जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसल्याच्या वृत्तास जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत या शेतकऱ्यांचे पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. या योजनेचे जिल्ह्यात सव्वालाख लाभार्थी आहेत. त्यातील बहुतांशी शेतकरी ‘कर’ भरणारे धनवान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या पेन्शनची रक्कम वसूल करण्याची कारवाई याआधीच सुरू केली आहे. पात्र, ठरलेल्या काही शेतकऱ्यांचे निधन झाले आहे. हयातीचा दाखला आणि अन्य माहितीसह ई-केवायसी जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली नाही. आता ३१ ऑगस्टपर्यंत केवायसीची ही कमी भरून न काढल्यास या शेतकऱ्यांची बुधवारपासून पेन्शन बंद होणार आहे. त्वरित ई-केवायसी कराकेंद्र शासनाच्या या सहा हजारांच्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हयात असल्यासह अन्य माहिती यंदा शेतकऱ्यांनी नोंद करण्याची अट घातली होती. संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या माहितीचे केवायसी संबंधित कृषी विभागाकडे, यंत्रणेकडे नोंद करण्याची गरज आहे. अन्यथा त्यांना या पेन्शनच्या लाभापासून कायमचे वंचित राहावे लागणार असल्याचे कुटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाthaneठाणे