शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

जिल्ह्यातील आतापर्यत ५६ हजार मजूर मूळगावी रवाना तर 65 हजार जणांना पाठवण्याचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 19:54 IST

लॉकडाऊन झाल्याने रोजगार गमावलेल्या  कामगारांचे आपापल्या राज्यात परतण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पायी, तसेच  मिळेल त्या वाहनातून आपल्या गावी परतण्याचे प्रयत्न हे मजुर करीत

ठाणे : जिल्ह्यातील   उत्तर प्रदेश, बिहार,  राजस्थान, मध्य प्रदेश,  ओरिसा, झारखंड या  राज्यांमध्ये आतापर्यंत २१ हजार ४७५ स्थलांतरित मजुरांना १७ ट्रेनमधून तर एक ५५३ बसेसमधुन ३४ हजार ४८५ जण  आदी आज अखेरपर्यंत ५६ हजार मजुर त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले आहे.  तर ६५ हजार पेक्षा अधिक जणांनी नोंदणी झाली असून परवानगी मिळताच त्यांना त्यांच्या राज्यात व जिल्ह्यात पाठविण्यात येणार, अशी  माहिती ठाणे  जिल्हाधिकारी  राजेश नार्वेकर यांनी दिली.

लॉकडाऊन झाल्याने रोजगार गमावलेल्या  कामगारांचे आपापल्या राज्यात परतण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पायी, तसेच  मिळेल त्या वाहनातून आपल्या गावी परतण्याचे प्रयत्न हे मजुर करीत. आहेत. जिल्हा प्रशासनाने या मजुरांची  यादी तयार करुन त्यांना  रेल्वेने घरी पोहोचविण्यासाठी उपाययोजना  सुरु केल्या  आहेत. तसेच पायी चालणाऱ्या मजुरांना एका ठिकाणी थांबवून एसटी बसेसने रवाना करण्यात आले. राज्य सरकार आणि रेल्वेमंत्रालयाने वाहतुकीची विशेष व्यवस्था केल्याने या मजुरांनी आपल्या घराची वाट धरली आहे. जिल्ह्यातून उत्तर प्रदेशसाठी दोन  रेल्वेने दोन हजार ८३३मजुर, बिहारसाठी आठ रेल्वेने दहा हजार  ६३२ मजूर , मध्यप्रदेशसाठी दोन  रेल्वे ने एक हजार ६५२ मजूर, राजस्थानसाठी तीन रेल्वेने तीन ४९४ मजुर रवाना झाले आहेत. ओरिसा राज्यासाठी एका रेल्वेने एक हजार ३६४, झारखंडसाठी एका रेल्वेने एक हजार ५०० मजूर रवाना करण्यात आले आहेत. आज अखेरपर्यत ठाणे जिल्हा प्रशासनाकडे रेल्वेने घरी जाण्यासाठी ६५ हजार पेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे. संबंधित राज्यांशी समन्वय साधून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर रेल्वेचे नियोजन करण्यात येत आहे.मुंबईतील ठाणे मार्गे अनेक मजूर उत्तर भारतात जात आहेत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, माजिवाडा, तीन हात नाका, आदी पिकअप पॉइंटवरून मजुरांना सोडण्यासाठी बसेस सोडण्यात येत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच त्यांना सोडण्यात येत आहे.या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी पोलीस आणि महसूल विभाग समन्वय साधत आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील हे सर्व नियोजन करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMigrationस्थलांतरण