ठाणे : निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्या तक्रारीसह निवडणुकीच्या संबंधित माहिती विचारण्यासाठी १९५० ही हेल्पलाइन २४ तास सुरू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाइनवर आतापर्यंत जिल्ह्याभरातून सुमारे ३५० कॉल आले आहेत. त्याव्दारे मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात या हेल्पलाइनची सेवा सुरू आहेत. १ मार्चपासूनही सेवा सुरू आहे. परंतु आचारसंहिता लागल्यापासून या हेल्पलाइनचा जिल्ह्यातील जाणकारांनी लाभ घेतला आहे. तक्रारी ऐवजी मार्गदर्शनासाठी युवा - युवतींनी या हेल्पलाइनचा लाभ घेतल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहेत. उमेदवारी दाखल होण्याच्या दहा दिवस आधी मतदार नोंदणी सुरू आहे. यामुळे युवकांकडून अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी आवश्यक माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे.आयटी एप्लिकेशन्स म्हणजे मोबाईल अॅपचा या निवडणुकीत प्रथम वापर सुरू आहे. आचारसंहिता भंगची तक्रार सी व्हिजील अॅपव्दारे करण्याची संधी देण्यात आली आहे. परंतु अद्यापही या अॅपचा वापर झालेला आढळून आलेला नाही. या अॅपव्दारे तक्रार येताच अवघ्या १०० मिनिटात म्हणजे सुमारे दीड तासात त्यावर कारवाई होणार आहे. पण अद्यापही या अॅपचा वापर झालेला नाही. याशिवाय सुविधा अॅपव्दारे मतदाराना वाहन सुविधेसह पाणी, स्वच्छता आदींची माहिती मिळवता येईल. याशिवाय सुगम अॅपव्दारे राजकीय पक्षांना सभांसाठी सार्वजनिक ठिकाणाच्या मैदानांची बुकींसह जाहिराती ठिकाणाची बूक करणे शक्य होणार आहे.
निवडणुकीच्या माहितीसाठी आतापर्यंत जिल्ह्याभरातून १९५० हेल्पलाइनवर ३५० कॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 19:22 IST
जिल्हाधिकारी कार्यालयात या हेल्पलाइनची सेवा सुरू आहेत. १ मार्चपासूनही सेवा सुरू आहे. परंतु आचारसंहिता लागल्यापासून या हेल्पलाइनचा जिल्ह्यातील जाणकारांनी लाभ घेतला आहे. तक्रारी ऐवजी मार्गदर्शनासाठी युवा - युवतींनी या हेल्पलाइनचा लाभ घेतल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या माहितीसाठी आतापर्यंत जिल्ह्याभरातून १९५० हेल्पलाइनवर ३५० कॉल
ठळक मुद्दे१९५० ही हेल्पलाइन २४ तास आचारसंहिता भंगची तक्रार सी व्हिजील अॅपव्दारे करण्याची संधीतक्रार येताच अवघ्या १०० मिनिटात म्हणजे सुमारे दीड तासात कारवाई