शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीमुळे चेन स्नॅचर झाला पोलिसांचा ‘गुलाम’; सात वर्षांपासून होता फरार, खडकपाडा पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 00:03 IST

कल्याण आणि ठाणे शहरातील चार पोलीस ठाण्यांत मोक्कांतर्गत गुन्हे दाखल असलेला चेन स्नॅचर गुलाम उर्फ अब्बास मौसम इराणी उर्फ जाफरी (२८) याला खडकपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी आंबिवली परिसरात सापळा लावून अटक केली.

कल्याण : कल्याण आणि ठाणे शहरातील चार पोलीस ठाण्यांत मोक्कांतर्गत गुन्हे दाखल असलेला चेन स्नॅचर गुलाम उर्फ अब्बास मौसम इराणी उर्फ जाफरी (२८) याला खडकपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी आंबिवली परिसरात सापळा लावून अटक केली. तो परिसरात येणार असल्याची माहिती त्याच्याच पत्नीने पोलिसांना दिल्याने सात वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गुलाम पोलिसांच्या हाती लागला. कल्याण न्यायालयात सोमवारी हजर करण्यात आलेल्या गुलामला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कल्याणजवळील आंबिवली परिसरात असलेल्या इराणी वस्तीमध्ये राहणाऱ्या गुलाम याने दहा दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीसह सासूला मारहाण करत तेथून पळ काढला. याप्रकरणी त्याच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याचा मागोवा घेत तपास सुरू केला. रविवारी आंबिवली येथे गुलाम येणार असल्याची माहिती त्याच्या पत्नीने खडकपाडा पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे यांच्या पथकाने त्याला अटक केली.चार वेळा केली होती मोक्काअन्वये कारवाईगुलाम हा सराईत चेन स्नेचर असून त्याच्यावर २२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर चार वेळा मोक्का लावण्यात आला होता. त्याच्याविरोधात बाजारपेठ, नारपोली, वागळे इस्टेट, वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.गुलामने काही महिन्यांपूर्वी इराणी वस्ती परिसरात दुकान टाकले होते. मात्र, छाप्याची खबर मिळताच, तो पसार होत होता. पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर सात वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाºया गुलामला पकडण्यात पोलिसांना यश आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी