लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ३० वर्षीय रहिवाशाची ६० हजारांची सोनसाखळी दोघांनी जबरीने हिसकावल्याची घटना रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळव्यातील विटावा कोळीवाडा येथे राहणारे एक ३० वर्षीय गृहस्थ २ मे रोजी सकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते विटावा भागातून जात असतांना त्यांच्या पाठीमागून पायी आलेल्या एकाने त्यांची सोनसाखळी जबरीने खेचली. त्यानंतर त्याच्या पाठीमागून मोटारसायकलीवरुन आलेल्या ३० ते ३५ वर्षीय साथीदाराबरोबर त्याने पलायन केले. हे दोघेही जुन्या बेलापूर रोडवरुन कळव्याच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मॉर्निंग वॉकसाठी जाताना सोनसाखळी हिसकावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 00:02 IST
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ३० वर्षीय रहिवाशाची ६० हजारांची सोनसाखळी दोघांनी जबरीने हिसकावल्याची घटना रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॉर्निंग वॉकसाठी जाताना सोनसाखळी हिसकावली
ठळक मुद्दे विटाव्यातील घटना