शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गांजाच्या तस्करीसाठी तेलंगणातून आलेल्या तस्कराला मुंब्य्रात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 20:06 IST

गांजा तस्करीतील शिवाजी या कर्नाटकातील टोळी प्रमुखाला अटक झाल्यानंतर त्याचा व्यवसायावर कब्जा करुन ठाणे- मुंबईत गांजाच्या तस्करीसाठी पाय रोवणाऱ्या प्रकाश पवार या तेलंगणातील तस्कराला ठाणे पोलिसांनी गांजाच्या साठयासह अटक केली आहे.

ठळक मुद्दे चार लाखांचा २५ किलो गांजा हस्तगत ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाईपळून जाण्याच्या प्रयत्नात असलांनाच पोलिसांनी घेतले ताब्यात

ठाणे: गांजाच्या तस्करीसाठी हैद्राबाद, तलंगणा राज्यातून मुंब्य्रामध्ये आलेल्या प्रकाश पवार (२७, रा. रा. लिंगमपल्ली, हैद्राबाद, तेलंगणा) याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने नुकतीच अटक केली. त्याच्याकडून चार लाख रुपये किंमतीचा २५ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस विजय पोवार, पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड, पोलीस नाईक शिवाजी शेगर, नामदेव मुंढे आणि अनुप राक्षे आदींचे पथक मुंब्रा परिसरात ३ जुलै २०१९ रोजी गस्त घालीत होते. याच गस्ती दरम्यान शीळ मुंब्रा रोडवरील वाय जंक्शन येथे एक संशयास्पद व्यक्ती पळून पोलिसांना पाहून पळून जात असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्याला या पथकाने शिताफीने पकडले. प्रकाश पवार असे नाव त्याने सांगून आपण रिक्षा चालक असल्याचे सांगितले. मुळ कर्नाटकातील बिदर जिल्हयातील जगमी बॉर्डर येथील असून तेलंगणातील हैद्राबाद येथे वास्तव्याला असल्याचेही त्याने सांगितले. त्याच्या अंगझडतीमध्ये दहा किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर काही वस्तू असा एक लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे न्यायालयाने त्याला १२ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये त्याने हैद्राबाद येथे लपवून ठेवलेला १५ किलो वजनाचा गांजाही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्याच्याकडून आतापर्यंत २५ किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तो हैद्राबाद येथून ठाणे, मुंबईमध्ये गांजाची तस्करी करीत होता. कर्नाटकातील शिवाजी या गांजा तस्कराकडे तो काम करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याला कर्नाटक पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे शिवाजीच्या गांजाच्या मार्केटवर प्रकाशने कब्जा केला होता. तो हळू हळू या तस्करीमध्ये आपला जम बसवित असतांनाच ठाणे पोलिसांनी त्याला संपूर्ण मालासह पकडल्यामुळे तो यामध्ये अडकला. त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत, याचाही सखोल तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीmumbraमुंब्रा