शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्धी' अपघात : जीवाच्या आकांतानं ३० फुटांवरून भातशेतात मारली उडी, बचावलेल्या प्रेमप्रकाशने सांगितला रात्रीचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 07:37 IST

समृद्धी महामार्गाच्या कामात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या आणि शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला प्रेमप्रकाशनं ‘लोकमत’शी बोलताना सांगितला थरार...

श्याम धुमाळ -

कसारा : रात्रीचे पावणेबारा वाजले होते. गर्डर बसविण्याचे काम सुरू होते. पावसाची रिपरिप सुरू होती. आजूबाजूला चिखलाचे साम्राज्य असल्याने पाय घसरण्याची भीती होती. काही जण थेट गर्डरच्या खाली होते. मी आणि माझ्यासह काही कामगार गर्डरच्या वर चढविण्यासाठी ३० ते ३५ फुटांवर चढलो होतो. अचानक घर्षण झाले. गर्डर लॉन्चरमध्ये स्पार्क उडाला. त्याच्या ठिणग्या चमकत उडाल्या आणि प्रचंड आवाज करत लॉन्चरसह गर्डर कोसळले. सारे इतक्या क्षणात घडले, की कुणाला कसलाही विचार करायलाही वेळ मिळाला नाही. मी गर्डरच्या वरच्या मजल्यावरून जीवाच्या आकांताने जवळच्या भातशेतीत उडी घेतली. वरून पडल्याने मला चांगलाच मार लागला होता. तब्बल तासभर मी भातशेतीच्या चिखलात निपचित पडून होतो... समृद्धी महामार्गाच्या कामात झालेल्या अपघातात जखमी झालेला आणि शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला प्रेमप्रकाश ‘लोकमत’शी बोलत होता.प्रेमप्रकाश म्हणाला, तासाभरानंतर मी शुद्धीवर आलो. तेव्हा गर्डरखाली अडकलेले माझे काही साथीदार रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. किंचाळत होते. विव्हळत होते. काहींना क्षणाचीही उसंत मिळाली नाही. मृत्यूने त्यांचा घास घेतला. आजूबाजूच्या गावातील काही तरुण मदतीकरिता आले होते. मात्र गर्डरचे वजन प्रचंड असल्याने त्यांना मदतकार्य करणे अशक्य होते. तरीही ग्रामस्थांनी काहींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. ग्रामस्थांच्या मदतीने मी भातशेतीतून बाहेर आलो. लोकांनी मला पाणी दिले. मी प्रचंड भेदरलो होतो. मृत्यू माझ्या शेजारून गेल्याचाच जणू तो अनुभव होता.मी इतक्या वरून जीवाच्या आकांताने उडी मारली नसती, तर कदाचित मीही आज जिवंत नसतो. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मला माझ्या कुटुंबीयांची आठवण झाली. अशा संकटाच्या क्षणी आपल्याबरोबर जीवाभावाचे कुणीच नाही, या विचाराने मन विषण्ण झाले. अशा कामाच्या वेळी जोखीम प्रचंड असते. मात्र अधिक काळजी घेऊन काम केले, तर अशी जीवितहानी टाळता येऊ शकते. माझ्याबरोबर जखमी झालेल्या अन्य दोघा साथीदारांना गंभीर जखमा असल्याने ठाण्यात व नंतर मुंबईला उपचाराकरिता हलविल्याचेही त्याने सांगितले. 

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातhospitalहॉस्पिटल