शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

ठाण्यात महावितरणचे स्मार्ट मीटर, ४०० कोटींचा आराखडा

By admin | Updated: December 12, 2015 01:39 IST

घरातला एसी सुरु केला तर किती युनिट वीज वापरली गेली आणि कपड्यांना इस्त्री करताना किती युनिट वीज लागली हे घरबसल्या पाहण्याची सुविधा असलेले स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय

अजित मांडके,  ठाणेघरातला एसी सुरु केला तर किती युनिट वीज वापरली गेली आणि कपड्यांना इस्त्री करताना किती युनिट वीज लागली हे घरबसल्या पाहण्याची सुविधा असलेले स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यामुळे मी घरात नव्हतो तरी मला एवढे भरमसाठ बिल कसे आले, अशा तक्रारी करायला वीज ग्राहकांना संधी राहणार नाही. शिवाय आपण वीज बचत करुन किती पैसे वाचवले याचा नेमका अंदाज ग्राहकांना बांधता येणार असून पहिल्या टप्प्यात ९१ हजार मीटर बसविण्यात येणार आहेत.ठाणेकरांना स्मार्ट करण्यासाठी महावितरणने ही स्मार्ट मीटरची संकल्पना पुढे आणली आहे. ज्यामध्ये ग्राहकाला ही माहिती तत्काळ मीटरवरच पाहता येणार आहे. यासाठी महावितरणने ४०० कोटींचा पहिल्या टप्यासाठी स्मार्ट सिटीचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये, स्मार्ट मीटर, नवीन विद्युत रोहित्र बसविणे, वीज वाहिन्या बदलणे, भूमिगत वाहिन्या टाकण्यावर भर, विद्युत रोहित्राची क्षमता वाढविणे आदी कामे केली जाणार आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये ठाणे शहराची निवड झाल्यानंतर महापालिकेने स्मार्ट सिटीचा ५५५० कोटींचा आराखडा तयार केला आहे. स्मार्ट शहरातील वीज ग्राहकही स्मार्ट असला पाहिजे, त्याला विजेचा वापर आणि वीज बचत करता आली पाहिजे, हा यामागील हेतू आहे. कशासाठी स्मार्ट मीटर...१घरातील विद्युत उपकरणांच्या वापराचे प्रमाण वाढल्यामुळे विद्युत देयकांच्या रकमेत वाढ होते. मात्र अचानकपणे बिलाच्या वाढलेल्या रकमेमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यातून महावितरणचे अधिकारी व ग्राहक यांच्यात वाद होतात. मीटरमध्येच त्रुटी असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येतात. २या पार्श्वभूमीवर बसविण्यात येणारी स्मार्ट मीटर जीआयएस (जिओग्रॅफिक इन्फर्मेशन सिस्टीम) प्रणालीच्या धर्तीवर असणार आहेत. त्यामुळे महावितरणचे अधिकारी तसेच ग्राहकांना इंटरनेटच्या आधारे घरातील वीज वापर पाहता येऊ शकतो.