शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

स्मार्ट सिटीच्या सल्लागार कंपन्यांचे उखळ पांढरे - नारायण पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 00:32 IST

Thane News : स्मार्ट सिटी कंपनीतून ४२ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पांसाठी क्रिसिल रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन व पॅलाडियम कन्सल्टिंग इंडिया कंपनीची नियुक्ती केली आहे.

ठाणे - ठाणे शहरात स्मार्ट सिटीच्या कामांचा बोजवारा उडाला असताना, स्मार्ट सिटीसाठी नियुक्त केलेल्या सल्लागार कंपन्यांचे उखळ मात्र पांढरे झाले आहे. यंदाच्या वर्षी पहिल्या आठ महिन्यांत स्मार्ट सिटी कंपनीत १ कोटी ८८ लाख ७५ हजार १७६ रुपये प्रशासकीय खर्चाची नोंद झाली आहे. मात्र, त्यापैकी तब्बल १ कोटी ४० लाख रुपये दोन सल्लागार कंपनीच्या तिजोरीत जमा झाले. या प्रकाराला भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे.स्मार्ट सिटी कंपनीतून ४२ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पांसाठी क्रिसिल रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन व पॅलाडियम कन्सल्टिंग इंडिया कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपन्यांना एप्रिलपासून नोव्हेंबर, २०२० पर्यंत बिले देण्यात आली आहेत. त्यात क्रिसिलला १ कोटी १६ लाख ५४ हजार रुपये १६९ रुपये व पॅलाडियम कंपनीला २५ लाख ६७ हजार २१९ रुपये देण्यात आले. या दोन्ही कंपन्यांच्या तिजोरीत अवघ्या आठ महिन्यांत १ कोटी ४२ लाख रुपये जमा झाले, याकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे. कोरोनामुळे २५ मार्चपासून स्मार्ट सिटीचे काम ठप्प झाले होते, पण काही अंशी व्यवहार सुरू झाल्यानंतर १६ जुलै रोजी क्रिसिल कंपनीला तातडीने एकाच वेळी तीन बिलांचे ४१ लाख रुपये वितरित करण्यात आले, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. ‘दर तीन महिन्यांनी खर्च जाहीर करावा’शासकीय खर्चातून सल्लागार कंपनीच्या तुंबड्या भरण्याचा उद्योग स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सुरू आहे, असा आरोप करीत पवार यांनी स्मार्ट सिटीच्या पारदर्शक कारभारासाठी दर तीन महिन्यांने सविस्तर खर्च वेबसाईटवर जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. स्मार्ट सिटीतील ४२ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पांचे कार्यादेश २०१८ मध्ये देण्यात आले. त्यापैकी बहुतेक प्रकल्पांचे काम १० ते १५ टक्क्यांपर्यंतच झाले आहे. प्रकल्पातील अडचणी दूर झाल्या नाहीत. मात्र, सल्लागार कंपन्यांना दरमहा पैसे अदा केले जात आहेत, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणे