शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 09:46 IST

उल्हासनगरमधील कॅम्प नं - 1 येथील सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरमधील कॅम्प नं - 1 येथील सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावर कोणी राहत नसल्याने जीवितहानी झालेली नाही.

सदानंद नाईक

उल्हासनगर - उल्हासनगरमधील कॅम्प नं - 1 येथील सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावर कोणी राहत नसल्याने जीवितहानी झालेली नाही. शहरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने इमारतधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगरमध्ये इमारत कोसळण्याचे व स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असल्याने जुन्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या एका महिन्यात 12 पेक्षा जास्त इमारती महापालिकेने खाली केल्याने शेकडो कुटुंब बेघर झाले. त्यांच्यावर घर देता का घर म्हणण्याची वेळ आली. मंगळवारच्या महासभेत धोकादायक इमारतीवर चर्चा होऊन कोसळलेल्या व धोकादायक झालेल्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या  प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान कॅम्प नं-1 येथील 3 मजल्याच्या सचदेव कॉम्प्लेक्स इमारती मधील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडल्याने इमारती मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारती मधील 5 कुटुंबाना सुरक्षित बाहेर काढले. आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांच्यासह इतर पक्षाच्या नेत्यांनी इमारतीला भेट देऊन कुटुंबाची विचारपूस केली. गेल्या मंगळवारी 5 मजल्याची महेक इमारत पत्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. इमारत कोसळण्याच्या आदल्या दिवसी इमारत खाली केल्या 31 कुटुंबातील 150 जणांचा जीव वाचला. इमारती मधील स्लॅब कोसळण्याच्या सत्राने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगरमधील महेक इमारत याआधी मंगळवारी (13 ऑगस्ट) कोसळल्याची घटना समोर आली होती. खचलेल्या महेक इमारतीमधून सोमवारी 31 कुटुंबाना बाहेर काढण्यात आले होते. ही इमारत सीलबंद केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. इमारत कोसळल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणत प्लॉटधारकांनी परमेश्वरांसह पालिका अधिकाऱ्याचे आभार मानले होते. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सविस्तर माहिती घेऊन, इमारतीचा अहवाल येई पर्यंत इमारत सीलबंद करण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यांनी इतरांची मागणी न ऐकता इमारत सीलबंद करून इमारतीमध्ये जाण्यास लोकांना मज्जाव केला होता. महापालिका आयुक्त देशमुख व सहाय्यक आयुक्त कुमावत यांचा निर्णय अखेर योग्य ठरून 31 कुटुंबांचा जीव वाचला. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBuilding Collapseडोंगरी इमारत दुर्घटना