शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अतिधोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला; रहिवाशाच्या मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 20:11 IST

क्रांती डिपार्टमेंट रस्त्यामागे ही घटना घडली असून घरात आई आणि मुलगा राहत होते.

ठळक मुद्देविकास फडके (५२) यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोडसे इमारत ही दोन मजली इमारत असून ती अतिधोकादायक इमारत आहेत.

डोंबिवली - मुंबईत डोंगरी येथे इमारत कोसळून जवळपास १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता डोंबिवली पश्चिमेकडील अतिधोकादायक गोडसे इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना आज घडली आहे. क्रांती डिपार्टमेंट रस्त्यामागे ही घटना घडली असून घरात आई आणि मुलगा राहत होते. स्लॅब कोसळल्याने जखमी झालेल्या विकास फडके (५२) यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  

डोंबिवली पश्चिम येथील गोडसे इमारत ही दोन मजली इमारत असून ती अतिधोकादायक इमारत आहेत. त्यात राहणारे विनायक फडके हे जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले असता ते मृत असल्याचे घोषित करण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक यांनी दिली. या घटनेस दुजोरा देत केडीएमसी अधिकारी यांनी मृत व्यक्तीचे नाव विकास फडके असल्याचे सांगितले. महात्मा फुले रस्त्याच्या शुभारंभाला असलेल्या गोडसे या दोन मजल्याच्या अतिधोकादायक इमारतीत राहत्या घरातील स्लॅब कोसळून विकास फडके या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. गोडसे इमारत ही अतिधोकायक असून त्या दोन मजल्यामद्ये दोन भाडेकरू अनेक वर्षे वास्तव्याला होते. त्यातील फडके यांच्या घरी ते आणि त्यांची वयोवृद्ध आई रहात होती. स्लॅब पडण्याच्या दुर्घटनेत मुलगा मयत झाला असून वयोवृद्ध आई मात्र सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. फडके यांच्या अंगावर स्लॅब पडल्यानंतर ते जखमी झाले आणि त्या अवस्थेत त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले असता तेथे ते मयत असल्याचे घोषित करण्यात आले.घटनास्थळी तातडीने महापालिकेचे आपत्कालीन पथक, स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक, अग्निशमन यंत्रणा आदी पोहोचल्या असून प्रभाग अधिकारीही ज्ञानेश्वर कंकरे उपस्थित होते. अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यासंदर्भात महापालिका कमी पडत असल्याची टीका नागरिकांमधून व्यक्त।झाली. या इमारतीमध्ये तळ मजल्यावर 10 दुकाने असून त्यांनाही त्वरित खाली करण्यात यावे या संदरभात महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या मजल्यावरील एका कुटुंबाला मात्र तातडीने खाली उतरवण्यात आले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीDeathमृत्यूkdmcकल्याण डोंबिवली महापालिका