शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने खूनाचा प्रयत्न करणाऱ्या गुंडासह सहा जणांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 20:42 IST

पैशाच्या वादातून तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न करणाºया शिवा ठाकूर याच्यासह सहा आरोपींना ठाणे न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सहा वर्षांपूर्वी नोपाडयातील मल्हार सिनेमाच्या गेटजवळ हा प्रकार घडला होता.

ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचा निर्णयसात हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवात जमा झालेल्या वर्गणीच्या वादातून गुंड शिवा ठाकूर याच्यासह त्याच्या अन्य पाच साथीदारांनी सुनिल कोंडभर (३३, रा. नौपाडा, ठाणे) यांच्यावर तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी शिवा याच्यासह सहा जणांना ठाण्याचे अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सात वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.ठाण्याच्या मल्हार सिनेमागृहाच्या गेटजवळ ८ जून २०१४ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हे थरारनाटय घडले होते. शिवा आणि ज्यांच्या खूनाचा प्रयत्न झाला होता ते सुनिल कोंडभर हे नौपाडयातील दमाणी इस्टेट या एकाच परिसरात वास्तव्याला होते. कोंडभर हे हिंदू गर्जना मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यावेळी हिंदू गर्जना मंडळाच्या सभासदांमध्ये नवरात्रोत्सव आणि गणपती उत्सवामध्ये जमा झालेल्या वर्गणीवरुन वाद निर्माण झाला होता. शिवाजी उर्फ शिवा कल्याण ठाकूर (३५, रा. ठाणे) तसेच त्याचे साथीदार भारद्वाज उर्फ बाळा लोंढे (३५, रा. गवाणपाडा, मुलूंड), प्रसन्न उर्फ बबलू हुमणे (२९, रा. प्रशांतनगर, डोंबिवली, ठाणे), प्रशांत खोपडे (२३, रा.पाचपाखाडी, ठाणे), गणेश पवार उर्फ गण्या (२४, रा. वर्तकनगर, ठाणे), आणि सागर जाधव (२३, रा. कशेळी, भिवंडी) यांनी गर्दी जमा करुन या भांडणाचा राग मनात धरुन शिवा आणि गणेश पवार यांनी तलवारीने सुनिल यांच्या कमरेवर, डाव्या हाताच्या मनगटावर, खांद्यावर वार करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणीही पुढे येऊ नये म्हणून इतरांनी तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करीत शिवीगाळ आणि दमदाटी केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे, दंगल माजविणे आणि आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला होता. यात भारद्वाज याला २७ आॅक्टोंबर रोजी तत्कालीन पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा आणि पोलीस हवालदार भास्कर वीरकर यांच्या पथकाने अटक केली होती. त्यापाठोपाठ यातील सर्व आरोपींना अटक करुन तलवारही जप्त केली होती. या सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठविल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि हवालदार राजू निकुंभे यांनी न्यायालयात सबळ साक्षी पुरावे सादर केले. त्याआधारे सरकारी वकील संजय लोंढे यांनी न्यायालयात फिर्यादी कोंडभर आणि पोलिसांची भक्कमपणे बाजू मांडली. त्याआधारे न्यायालयाने ४ डिसेंबर रोजी शिवासह सर्व आरोपींना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय