शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

दोघा व्यावसायिकांचे अपहरण करणाऱ्या ६ जणांना अटक

By admin | Updated: April 26, 2017 21:58 IST

व्याजाने दिलेल्या १२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी पनवेलच्या दोघा रहिवाशांचे अपहरण केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने

ऑनलाइन लोकमतमीरारोड, दि. 26 -  व्याजाने दिलेल्या १२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी पनवेलच्या दोघा रहिवाशांचे अपहरण केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने भार्इंदर मधुन ६ जणांना अटक केली आहे. पनवेलच्या खांदा कॉलनी येथे राहणारे दिनेश रंधेरीया यांनी व्यवसायासाठी संदिप श्रीकांत पारकर (३१) रा. सावरकर नगर, ठाणे याच्या कडुन १२ लाख रुपये व्याजाने घेतले होते. संदिप पैशांचे मागणी करत असता दिनेशने त्याला टोलवाटोलवी चालवली होती. पैसे वसुलीसाठी संदिप व त्याच्या साथीदारांनी दिनेशचे खांदा कॉलनी येथुन अपहरण केले. व दिनेश हवा असेल तर ५ लाख रुपये घेऊन भार्इंदरला पाठवण्यास त्याच्या पत्नीला सांगीतले. दिनेशच्या पत्नीने सदर बाब मालेवाडी येणे राहणारे अ‍ॅल्डिसन पोय्याकारण यांना सांगीतल्यावर ते मित्रासह दिशेनचा शोध घेत भार्इंदरला आले. दरम्यान दिनेशच्या अपहरणाची बाब पोलिसांच्या निदर्शनास आणुन दिल्यावर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले. दरम्यान भार्इंदरच्या मॅक्सस चौकी जवळ पोय्याकरण आले असता त्यांना सुध्दा संदिप व त्याच्या साथीदारांनी बळजबरी गाडीत घातले. त्याचवेळी गुन्हे शाखेच्या पथकाने दिनेश व पोय्याकरणची सुटका करत संदिप सह शंकर तात्याबा शेलार (२८) व सुशील भागोजी मोरे (२८) दोघेही रा. गौरीशंकरवाडी, घाटकोपर; रॉजर निस्टर दिनीस (३०) रा. पालीगाव , भार्इंदर ; विशाल विश्वास मोरे (२७) रा. सावरकर नगर, ठाणे व सचीन यशवंत पोकरे (३७) रा. मानेचाळ, लोअर परळ या सहाही आरोपींना ताब्यात घेतले. सदर आरोपींसह सह त्यांचे वाहन, मोबाईल आदी भार्इंदर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रणजीत चव्हाण तपास करत असुन अटक आरोपींना २८ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. ( प्रतिनिधी )