ठाणे : मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढल्यानंतर दंगल माजवणा-यांपैकी वागळे इस्टेट पोलिसांनी आणखी पाच, तर नौपाडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे यातील अटक आरोपींची संख्या आता ५४ झाली आहे.सुरुवातीला या दंगल प्रकरणात नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव, निरीक्षक संजय धुमाळ आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या पथकाने शिवसेनेचे माजी नगरसेवक शरद कणसे यांच्यासह २३ जणांना, त्यापाठोपाठ पाच अशा २८ जणांना अटक केली होती. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण, पोलीस निरीक्षक सीताराम वाघ आणि संजय गायकवाड यांच्या पथकानेही सुरुवातीला राजेश बागवे या मनसे पदाधिकाºयासह १३ जणांना त्यापाठोपाठ सात अशा २० जणांना अटक केली. त्यानंतर, २८ जुलै रोजी नौपाडा पोलिसांनी संदीप यादव (रा. रामचंद्रनगर) याला अटक केली. वागळे इस्टेट पोलिसांनी आकाश जोशी (२६, रा. किसननगर), अनिकेत गावडे (१९, रा. लोकमान्यनगर, पाडा क्रमांक ४), आकाश साबळे (२६, शांतीनगर, वागळे इस्टेट), सुरेश पोळ (२५, रा. रामचंद्रनगर) आणि रमेश गायकवाड (२४, रा. मानपाडा, आझादनगर, ठाणे) या पाच जणांना अटक केली. त्यामुळे यातील अटक आरोपींची संख्या आता ५४ झाली आहे. या सहाही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. अटकेतील आरोपींच्या व्यतिरिक्त दंगलीशी संबंधित अनेकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यात तथ्य आढळल्यानंतरच आणखी आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायकगावकर यांनी सांगितले. बंद आणि आंदोलनादरम्यान हिंसक कारवाया करणा-यांवरच कारवाई केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले. दरम्यान, आंदोलनानंतर अनेकांची धरपकड झाल्याने आरोपींच्या कुटुंबीयांनी सलग तिस-या दिवशीही नौपाडा पोलीस ठाण्यात विचारपूस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.-
ठाण्यातील दंगलप्रकरणी आणखी सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 21:53 IST
मराठा आरक्षण ठोक मोर्चा काढून दंगल माजविणाऱ्या आणखी सहा जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे यातील आरोपींची संख्या आता ५४ झाली आहे.
ठाण्यातील दंगलप्रकरणी आणखी सहा जणांना अटक
ठळक मुद्देआरोपींची संख्या ५४वागळे इस्टेटमध्ये पाच जणांना अटक कारवाईचे सत्र सुरुच