शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर महिलेविरोधात अर्वाच्च भाषेत टीका करणा-या ६ मनसैनिकांना अटक व जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 17:01 IST

एलफिन्स्टन पादचारी पूल दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याविरोधात फेसबुकवर लिखाण करणा-या महिलेस अर्वाच्च व अपशब्दात प्रतिक्रिया देणा-या ६ मनसैनिकांना भार्इंदर पोलिसांनी अटक केली.

मीरारोड - एलफिन्स्टन पादचारी पूल दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याविरोधात फेसबुकवर लिखाण करणा-या महिलेस अर्वाच्च व अपशब्दात प्रतिक्रिया देणा-या ६ मनसैनिकांना भार्इंदर पोलिसांनी अटक केली. ठाणे न्यायालयाने सर्वांची जामिनावर मुक्तता केली आहे.

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेस पूल, रस्ते अडवून बसणारे फेरीवाले जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. दरम्यान उच्च न्यायालयाने देखील रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर तर शाळा, रुग्णालय, धार्मिक स्थळापासून १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली होती.दरम्यान राज ठाकरे यांच्या निर्देशानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी फेरीवाल्यांना मारहाण वा त्यांच्या हातगाड्या उलथवून टाकणे आदी प्रकार चालवले होते. या विरोधात भार्इंदरला राहणा-या कल्पना संजय पांडे या महिलेने फेसबुकवर लेख लिहिला होता. त्या लेखा विरोधात राज्यभरातून मनसैनिकांनी निषेध केला होता. परंतु निषेध करतानाच त्यावर प्रतिक्रिया मात्र दमदाटीच्या तसेच अर्वाच्च अपशब्दात टाकल्या होत्या.या विरोधात पांडे यांनी भार्इंदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया देणा-या अशा १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. फेबुकवर प्रतिक्रिया देणारे मनसैनिक राज्यातल्या विविध भागातले असल्याने पोलिसांनी त्यांचे नाव, पत्ते, संपर्क क्रमांक आदी शोधून काढत नोटिसा बजावायला सुरुवात केली.यातील ६ जणांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. अटक आरोपींमध्ये योगेश शांताराम चिले (३५) रा. कामोठे पोलीस ठाणेजवळ ; कौस्तुभ नंदकुमार लिमये (२५) रा. ब्राह्मणआळी, शहापुर ; मच्छींद्र एकनाथ गर्जे रा. आष्टी , बीड ; योगेश धोंडु तांबे (२५) रा. पेंडकळे, राजापुर ; अमोल रमेश सोगम (३१) रा. धोपेश्वर, राजापुर व सोनाली शिवाजी पाटील (२८) रा. बिंबिसार नगर, गोरेगाव यांचा समावेश आहे. या प्रकरणी अन्य आरोपींचा शोध सुरू असून, पांडेय यांचे पती वकील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे