शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एकाच रात्रीत सहा घरांमध्ये चोरी: महापौरांच्या बहिणीकडेही चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:06 IST

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या बहिणीच्या घरासह शहरातील सहा ठिकाणी मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास चोऱ्या झाल्या.या चोºयांच्या सत्रामुळे महापौर शिंदे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे मानपाडा आणि ज्ञानेश्वरनगरातील घटनामहापौरांनी व्यक्त केली चिंतातपासाबरोबर गस्त वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या बहिणीच्या घरासह शहरातील सहा ठिकाणी मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास चो-या झाल्या. याप्रकरणी कापूरबावडी आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. एकाच रात्रीमध्ये झालेल्या या चो-यांच्या सत्रामुळे महापौर शिंदे यांनी चिंता व्यक्त केली आहे.शिंदे यांची बहीण शोभा आणि मेहुणे प्रसन्न कोटीयन हे मानपाड्यातील स्मशानभूमी रोडवरील कांचनगंगा चाळीत वास्तव्याला आहेत. अलीकडेच त्यांनी घराचे बांधकाम सुरूकेल्यामुळे त्यांचे मोजकेच सामान या घरात होते. ते तात्पुरते जेैन मंदिराजवळील घरामध्ये वास्तव्याला गेले आहेत. कांचनगंगा चाळीतील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दोन हजारांची रोकड लंपास केली. याच भागातील शांतिदूत बौद्ध विहाराच्या बाजूला असलेल्या संदीप भिंगारदिवे यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याच्या मंगळसूत्रासह एक लाख दोन हजारांचा ऐवज चोरीस गेला. भिंगारदिवे हे मंगळवारी पहाटे घराला कुलूप लावून त्यांच्या अन्य घरात पत्नीसह गेल्यानंतर चोरट्यांनी डाव साधला. तिस-या घटनेत शिवाकांत यादव यांच्या घरातूनही मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी १२ हजार ६०० चा ऐवज चोरला. यादव हे घराच्या माळ्यावर झोपले असताना तळ मजल्यावरील दरवाजाची कडी उचकटून चोरी झाली. तिन्ही प्रकरणांत कापूरबावडी पोलीस ठाण्यात २५ सप्टेंबरला एकत्रित गुन्हा दाखल झाला आहे. तर, वागळे इस्टेट भागातील ज्ञानेश्वरनगरातील चाळ क्र. २९ मधील आनंदा पाटील यांच्याकडे पाच हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. चाळ क्र. ३६ मधील प्रदीप बच्छाव यांच्या घरातून चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली. तर, सोमेश्वर सोसायटीतील बाळा भोईर यांच्या घरातून २५ हजारांची रोकड आणि तीन तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास झाला. या तिन्ही घरातील रहिवासी गावी गेल्याची संधी साधून ही घरे फोडली. याप्रकरणी आता वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. ज्ञानेश्वरनगर, फुलेनगर भागात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी भाजपाचे पदाधिकारी कैलास पाटील यांनी केली आहे. 

‘‘मानपाड्यात मुख्य सात ठिकाणी १५ दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही बसवले. आम्ही चोरीची तक्रार करणार नव्हतो, पण एकापेक्षा जास्त ठिकाणी चो-या झाल्यामुळे तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे गांभीर्याने घेऊन शहरातील चो-यांचा तपास करणे अपेक्षित आहे.’’मीनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी