शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेटमधून सहा तरुणींची ठाणे पोलिसांनी केली सुटका: महिला दलाल अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 21:13 IST

उच्चभ्रू मॉडेल्स, चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये कनिष्ठ कलाकार म्हणून भूमीका करणाऱ्या तरुणींकडून ‘सेक्स रॅकेट’ चालवित असल्याची ठाणे पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने दलाल महिलेला ठाण्यातून अटक केली. तिच्या तावडीतून सहा तरुणींचीही सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे कनिष्ठ कलाकार आणि उच्चभ्रू मॉडेल यांच्याकडून सुरु होता देहव्यापारठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाची कारवाई एका मॉडेलचा ५० हजारांमध्ये ‘सौदा’

ठाणे: ट्वीटर अ‍ॅप्लीकेशनमध्ये जाहिरात देऊन कनिष्ठ कलाकार तरुणी आणि उच्चभ्रू मॉडेल यांच्या मार्फतीने हजारो रुपयांच्या मोबदल्यामध्ये सेक्स रॅकेट चालविणा-या उषा दोशी (५५, रा. मीरा रोड, ठाणे) या दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे. यातील मुख्य सूत्रधाराचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.उच्चभ्रू मॉडेल्स, चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये कनिष्ठ कलाकार म्हणून भूमीका करणा-या तरुणींकडून एक दलाल सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या दलालाशी संपर्क साधला. तेंव्हा त्याने मीरा रोड येथील उषा या महिलेचा मोबाइल क्रमांक पोलिसांना दिला. उषाशी कडलक यांच्या पथकाने संपर्क साधला असता, तिने एका मॉडेलसाठी ५० हजारांची बोली केली. सौदा पक्का झाल्यानंतर पोलिसांच्या बनावट गि-हाइकाने या महिलेशी संपर्क केला. तेंव्हा तिने ठाण्याच्या मासुंदा तलावाजवळील हॉटेल साईकृपा येथे येण्यास सांगितले. याठिकाणी पोलीस उपायुक्त दीपक देवराज, निरीक्षक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक अरुण पगार, पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर आणि अंशिता मिसाळ आदींच्या पथकाने सापळा लावून उषाला रंगेहाथ पकडले. त्यावेळी तिने शरीरविक्रयासाठी आणलेल्या सहा तरुणींचीही तिच्या तावडीतून पोलिसांनी सुटका केली. मुख्य दलाल आणि सूत्रधार असलेल्या तिचा साथीदार ट्वीटरवर जाहिरात देऊन या तरुणींकडून जबरदस्तीने शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेत होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात उषासह दोघाविरुद्ध पिटांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अटक करण्यात आली असून तिच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट