शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

केबल व्यावसायिकाची पाच लाखांची सुपारी घेऊन गोळीबार करणाऱ्या सहा हल्लेखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 23:17 IST

पैशांसाठी बहिणीला मारहाण करीत पैसे लेडीज बार आणि जुगारामध्ये उडविणा-या मेव्हण्याचीच पाच लाखांमध्ये सुपारी दिल्याचे ठाणे खंडणी विरोधी पथकाने उघडकीस आणले. याप्रकरणी सहा हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एका पिस्टलसह दोन काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देबहिणीला पैशांसाठी मारहाण केल्याने मेहुण्यानेच दिली होती सुपारीठाणे खंडणीविरोधी पथकाने केला तपास एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कल्याण येथील केबल व्यावसायिकाला ठार मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी घेतल्यानंतर मोटारसायकलने येऊन गोळीबार करणा-या मुनवर शेख (३२, रा. राबोडी, ठाणे) याच्यासह चौघा हल्लेखोरांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून खुनी हल्ल्यासाठी वापरलेले एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. बहिणीला पैशांसाठी मारहाण केल्याने मेहुण्यानेच सुपारी दिल्याचेही तपासात उघड झाल्याचे देवराज यांनी सांगितले.कल्याणमधील बाजारपेठ भागातील एक व्यापारी मुदतसर ऊर्फ गुड्डू मुनवर (३९) यांच्यावर २९ आॅक्टोबर २०१९ रोजी वालधुनी येथे मोटारसायकलने आलेल्या दोघांनी पिस्टलमधून दोन राउंड गोळीबार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मुनवर यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जे.डी. मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम, पोलीस हवालदार सुरेश मोरे, कल्याण ढोकणे, नितीन ओवळेकर आणि अंकुश भोसले आदींच्या पथकाने मुनवर याच्यासह ईशाद कुरेशी (२८, रा. राबोडी), शैबाज पोके (२४, रा. कोनगाव, भिवंडी), अफताब शेख (१९, रा. कोनगाव, भिवंडी), निहाद करेल (२८, रा. कोनगाव, भिवंडी) आणि इस्माईल मांडेकर ऊर्फ बाबा (२९, रा. कल्याण) या सहा जणांना अटक केली. यातील मुनवर आणि ईशाद या दोघांनी पिस्टलमधून गोळीबार केल्याचे तपासात उघड झाले. शैबाज आणि अफताब यांनी रिक्षामधून मुदतसर यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या हालचालींची माहिती निहाद करेल याला दिली. ही माहिती निहाद याने मुनवर आणि ईशाद यांना देऊन कट रचून हल्ला केला. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल खरेदीसाठी निहाद याला इस्माईल मांडेकर याने आर्थिक मदत केली. इस्माईल याच्या बहिणीबरोबर मुदतसर यांचे १५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तो तिला नेहमी मारहाण करून सतत पैशांची मागणी करतो. ते पैसे लेडिज बारमध्ये आणि जुगारामध्ये उडवतो. तसेच त्याचे एका बारगर्लबरोबर अनैतिक संबंध असल्याने त्याने मुदतसर याला ठार मारण्यासाठी निहादला पाच लाखांची सुपारी दिली होती, असेही चौकशीत उघड झाले. या सर्व आरोपींना २९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक