शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 00:50 IST

क्षुल्लक कारणावरुन इंदिरानगर येथील विजय यादव (३३) यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने हल्ला करीत त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाºया सुरेश राजभर (२१, रा. इंदिरानगर, ठाणे) याच्यासह सहा जणांच्या टोळीला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली.

ठळक मुद्देश्रीनगर पोलिसांची कारवाईतीन अल्पवयीन मुलांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: क्षुल्लक कारणावरुन इंदिरानगर येथील विजय यादव (३३) यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने हल्ला करीत त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाºया सुरेश राजभर (२१, रा. इंदिरानगर, ठाणे) याच्यासह सहा जणांच्या टोळीला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. यातील तिघांना २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.विजय यादव हे १९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर येथील आई माता मेडिकल समोरील रोडवर उभे होते. त्याचवेळी १८ जानेवारी रोजी झालेल्या भांडणारच्या रागातून अमन गुप्ता, निलेश यादव, अमरजित उर्फ मटरू यादव आणि मुन्ना अशा सहा जणांच्या टोळक्याने आपसात संगनमत करून लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडने त्याला जबर मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला आणि पाठीवर गंभीर जखमा केल्या. तसेच चाकूने डाव्या डाताला गंभीर जखमा करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याचीच गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे यांच्या पथकाने इंदिरानगर येथील सुरेश राजभर तसेच अमरजित यादव(२१), अमन गुप्ता (१९) आणि अन्य तीन अल्पवयीन अशा सहा जणांना अटक केली आहे. तीन अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी