ठाणे : घोडबंदर रोड येथील एका खासगी रुग्णालयातून घरी जात असलेल्या १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिच्या आई आणि बहिणींनाही चावा घेणा-या प्रविण यादव (२५) या मद्यपीला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.घोडबंदर भागात ब्युटीपार्लर चालविणारी ही तरुणी आजारी असल्यामुळे २५ फेब्रुवारी रोजी किंगकाँगनगरातील रुग्णालयात गेली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास ती घरी जात असतांनाच प्रविणने तिला रस्त्यातच गाठूनअश्लील शेरेबाजी करून तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर तिची आई आणि दोघी बहिणी तिच्या मदतीला धावून आल्या. तेंव्हा त्याने या तिघींनाही चावा घेतला. तर तिच्या वडिलांना हाताने ओरखडून त्यांना मारहाण केली. इतके करूनही त्याने तिच्या कुटूंबियांनाच बघून घेण्याची धमकी दिली. त्याने यापूर्वीही या तरुणीला अनेकदा त्रास दिला होता. याबाबत तिच्या आईने तक्रारही केली होती. रविवारी त्याने विनयभंग करून तिच्या कुटूंबियांनाही मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार २६ फेब्रुवारी रोजी सकाळी तिने दाखल केली. ती दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पवार याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यात तरुणीचा विनयभंग करून बहिणींनाही चावा: मद्यपी आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 21:15 IST
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर राहण-या एका तरुणीचा विनयभंग केल्यानंतर तिच्या बहिणीसह आईलाही चावा घेऊन वडीलांना मारहाण करणा-या प्रविण यादव या मद्यपीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.
ठाण्यात तरुणीचा विनयभंग करून बहिणींनाही चावा: मद्यपी आरोपीस अटक
ठळक मुद्देवारंवार त्रास दिल्यानंतर विनयभंगाचा प्रकारमुलीच्या आईसह बहिणींवरही हल्लावडीलांना मारहाण करुन दिली धमकी