शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवाजवी फीविरोधात ‘सिस्टर निवेदिता’वर धडक, पालकांना शाळेच्या प्रवेशद्वारावर रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:48 IST

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता शाळेत इयत्ता पहिलीसाठी वर्षाला ३८ हजार रुपये प्रवेश फी आहे. ही अवाजवी फी कमी करण्यासाठी सोमवारी काही पालकांनी या शाळेवर धडक दिली.

डोंबिवली : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता शाळेत इयत्ता पहिलीसाठी वर्षाला ३८ हजार रुपये प्रवेश फी आहे. ही अवाजवी फी कमी करण्यासाठी सोमवारी काही पालकांनी या शाळेवर धडक दिली. यावेळी एका विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि पालकांना आत येण्यास मज्जाव केला. त्यामुळे जबरदस्तीने शाळेत घुसण्याचा प्रयत्न करणारे पालक, संघटनेचे पदाधिकारी आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक घडल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.एमआयडीसी निवासी भागात असलेली सिस्टर निवेदिता शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यात काही दिवसांपासून फीवरून संघर्ष सुरू आहे. पहिलीसाठी प्रवेश फी जास्त असल्याचा पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर संस्थाचालकांनी ३८ हजारांवरून ती ३२ हजारांपर्यंत कमी केली. मात्र, ही फी २७ हजारांपर्यंत कमी करण्याची पालकांची मागणी असून संस्थाचालकांनी त्यास नकार दिला आहे. फी ठरवण्याचा अधिकार संस्थेचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.शाळेच्या संस्थाचालकांना भेटण्यासाठी पालकांच्या प्रतिनिधींना परवानगी देण्यात आली; मात्र विद्यार्थी नेत्याला प्रवेश नाकारल्याने पालक संतापले. त्यामुळे त्यांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता प्रवेशाद्वारावर बाचाबाची झाली.दरम्यान, यावेळी संस्थाचालकांनी काही पालकांशी चर्चा केली, मात्र अखेरपर्यंत विद्यार्थी संघटनेच्या नेत्याला प्रवेश देण्यात आला नाही. संस्थेने जाहीर केलेल्या फीमध्ये बदल होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.हा शाळेचा अधिकारसिस्टर निवेदिता शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षू बेल्लारे म्हणाल्या की, इयत्ता पहिलीची फी ठरवण्याचा अधिकार शाळेच्या व्यवस्थापनाचा आहे. इयत्ता पहिली सोडून इतर इयत्तांची फी वाढवण्याचा अधिकार नियमानुसार असतो. इतर इयत्तांची फीवाढ पॅरेंट-टीचर असोसिएशन (पीटीए) सदस्यांच्या समितीकडून ठरवली जाते. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाकडे लक्ष वेधले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाdombivaliडोंबिवली