शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी ११२ महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस आयुक्तालयातून ९२ अधिकारी व कर्मचारी निवृत्त

By अजित मांडके | Updated: May 31, 2024 17:30 IST

महापालिकेत मात्र दरमहा सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून त्यामुळे पालिका रिक्त होऊ लागली आहे.

अजित मांडके, ठाणे : ठाणे महापालिकेतून सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. एप्रिल महिन्यात पालिकेच्या सेवेतून ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले असताना आता मे महिन्यात तब्बल ११२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे पोलीस सेवेतून देखील तब्बल ९२ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. महापालिकेत मात्र दरमहा सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून त्यामुळे पालिका रिक्त होऊ लागली आहे.

ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यात २०२४ सुरु होताच, पहिल्याच महिन्यात २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी २३ जणांची भर पडली. त्यानंतर एप्रिल महिन्यात तब्बल ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. त्यानंतर आता मे महिन्यात तब्बल ११२ अधिकारी, कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. यात सफाई कर्मचारी ३१, शिक्षक १७, लिपिक ११, कार्यकारी अभियंता ०५, प्राध्यापक ०२, मुख्याध्यापक ०२ आणि बिगारी, टेक्निशिअन, वाहनचालक, माळी अशा ४४ जणांचा समावेश आहे. महापालिकेचा आकृती बंध मंजुर झाला असला तरी देखील त्याची भरती प्रक्रिया अद्यापही राबविली गेलेली दिसत नाही.

 नव्या वर्षात जानेवारी महिन्यात नव्याने सुमारे २५०० नवीन पदे भरली जाणार होती. परंतु आता मे महिना संपला तरी देखील ही पदे भरण्यासाठी महापालिकेला मुहुर्त सापडू शकलेला नाही. तर महापालिका शाळांतून निवृत्त होणाºया शिक्षकांची संख्या वाढत आहे. त्यातही मागील काही वर्षापासून एका एका शिक्षकावर अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. मुख्याध्यापकांची देखील पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत.

दुसरीकडे ३१ मे च्या दिवशी पोलीस विभागातील ९२ जण सेवा निवृत्त झाले आहेत. यात  सहपोलीस आयुक्त गजानन काब्दुले यांच्यासह पोलीस निरिक्षक ०४, वरीष्ठ पोलीस निरिक्षक ०१, पोलीस उपनिरिक्षक ०७, स्वीस सहाय्यक -०१, श्रेणी पोलीस उपनिरिक्षक ३५, सह पोलीस निरिक्षक २६, पोलीस हवालदार १३, पोलीस नाईक ०२, शिपाई ९१, सफाई कामगार ०१ आदींचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPoliceपोलिस