शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

टोकियो ऑलिम्पिकमधील राज्यातील दहा खेळाडूंच्या शुभेच्छांसाठी जिल्ह्यात 'स्वाक्षरी मोहीम अभियान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 18:39 IST

Tokyo Olympics update: '23 जुलै रोजी सुरु होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक' स्पर्धेतील विविध खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील दहा खेळाडूंना शुभेच्छा देण्यात येत आहे.

ठाणे - '23 जुलै रोजी सुरु होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक' स्पर्धेतील विविध खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील दहा खेळाडूंना शुभेच्छा देण्यात येत आहे. यासाठी 'स्वाक्षरी मोहीम अभियान कार्यक्रम' येथील जिल्हा क्रीडा परिषद व येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे घेण्यात आले. यावेळी ठाणे महापौर नरेश म्हस्के व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी प्रथम स्वाक्षरी करून, या मोहिमेस गुरुवारपासून प्रारंभ केला आहे. ('Signature Campaign' in the district to wish ten athletes from the state for the Tokyo Olympics)

येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम आज पार पडला. राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत हा स्वाक्षरी मोहीम अभियान कार्यक्रम नियोजन भवन, ठाणे येथे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ठाणे महापौर नरेश म्हस्के यांच्याहस्ते फीत कापून या मोहिमेला प्रारंभ केला. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, सभापती संजय भोईर, ठाणे मनपा सभागृह नेते अशोक वैती, प्रियंका पाटील, मिनल पालांडे, क्रीडा- उपायुक्त आदी उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी या सर्व 10 खेळाडूंना ठाणे जिल्ह्यातर्फे वैयक्तिकरीत्या लेखी पत्र पाठवून शुभेच्छा देण्याबाबत सुचविले. तर प्रमुख पाहुणे महापौर नरेश म्हस्के, यांनी महाराष्ट्रातील या 10 खेळाडूंना संपूर्ण ठाणे वासियांतर्फे पदक प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास अनुसरून ठाणे मनपाच्या सहकार्याने दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे ठाणे जिल्ह्यातील 18 वर्षावरील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी कोविड-19 लसीकरण मोहिम देखील राबविण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील जवळपास 50 खेळाडूंनी याचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे, भक्ती आंब्रे, सुचिता ढमाले, मधुरा सिंहासने, महेंद्र बाभूळकर यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020thaneठाणे