शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

शिंदेंविरुद्ध आयएफएस असोसिएशन मैदानात; वनअधिकाऱ्यांवर राख फेकणे पडणार महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 00:56 IST

वनविभाग अधिका-याच्या अंगावर राख फेकण्याचे प्रकरण आता चांगलेच तापण्याचे संकेत दिसत आहे.

ठाणे : वनविभाग अधिका-याच्या अंगावर राख फेकण्याचे प्रकरण आता चांगलेच तापण्याचे संकेत दिसत आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) असोसिएशनने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून खा. श्रीकांत शिंदेंवर कारवाईची मागणी केली आहे. शिंदे यांच्यावर कोणती कलमे लावण्यात यावी, याची यादीच असोसिएशनने या पत्रात दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण शिंदे यांना चांगलेच जड जाण्याची चिन्हे आहेत.अंबरनाथ येथील मांगरूळ येथे वृक्षांची जाळपोळ केल्याच्या निषेधार्थ सोमवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोपरी येथील वनविभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. शिवसैनिकांनी वनविभागाच्या कार्यालयात घुसून अधिकाºयांच्या अंगावर राख फेकून झाडांच्या कुंड्याही टाकल्या होत्या. शिवसैनिकांनी गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर वनविभागाने एका अधिकाºयाला निलंबितदेखील केले होते. मात्र झाडे जाळणाºया समाजकंटकांवर कारवाई प्रस्तावित असताना शिंदे यांनी असा प्रकार केल्याने कर्मचारी आणि अधिकाºयांनी मंगळवारी कोपरी कार्यालयाबाहेर आंदोलन करून, शिंदे यांच्यावर कारवाई झाली नाही, तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला. आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर आले असून शिंदे यांच्यावर कारवाईसाठी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असोसिएशनने थेट मुख्य सचिवांना पत्र दिले आहे.कलमांची लांबलचक यादीअसोसिएशनने दिलेल्या पत्रामध्ये शिंदे तसेच त्यांच्यासोबत असलेल्या जवळपास २५० लोकांनी मुख्य वनसंरक्षक यांच्याबरोबर चुकीचे वर्तन केले असल्याचे नमूद केले आहे. वनअधिकारी कर्तव्यावर असताना अशा प्रकारे वर्तन करणे चुकीचे असून यामुळे अधिकाºयांचे मनोधैर्य खचले असल्याचे या पत्रामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कलम १२० बी, १४१, १४३, १४५, १४६, १४७, १४९, १५, १८६, १८९, ३१२, २३२, २४९, २५०, ३५१, ३५३ अशा कलमांची यादीच या पत्रामध्ये दिली आहे. या पत्रावर आता मुख्य सचिव काय भूमिका घेतात, यावर या प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे.केवळ स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आमच्यावर ३५३ अंतर्गत कारवाई करण्याआधी ज्या फॉरेस्ट अधिकाºयांमुळे वृक्षांची कत्तल झाली, त्यांच्यावर ३०२ अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित आहे. राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचा दावा केला जात आहे. परंतु, त्यातील एक कोटी वृक्ष तरी जगले आहेत का? यात खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचा वास येत आहे.- श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा

टॅग्स :thaneठाणे