आज भारतभर जनता कर्फ्यू असल्याने खाण्यापिण्यापासून सर्वच दुकाने बंद आहेत. पोलीस, डॉक्टर, नर्स, फिल्डवर काम करणारे पत्रकार यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आज स्वामी फाऊंडेशनने फळे, पाणी, बिस्किटची सोय केली आहे. गर्दी टाळण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते तीन तीनच्या गटाने फळांच्या पिशव्या संस्थेच्या कार्यालयात तयार करीत आहेत. स्वामी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांनी ही सोय केली आहे. तसेच एखाद्याला गरजू व्यक्ती आढळल्यास त्यांचीही जेवणाची सोय केली जाईल, असे आवाहन महेश कदम यांनी केले आहे. स्वामी फाऊंडेशनच्या कार्यालयात 8767711117 , 9029666567 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन कदम यांनी केले आहे.कोरोनावर मुकाबला करण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्न करीत आहे. डॉक्टर, नर्सेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झटत आहात. पोलीसही रस्त्यावर दिवस रात्र राबत आहेत. अचूक बातमी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारही काम करीत आहेत. यात त्यांचे खण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे या उद्देशाने मी ही सोय केली आहे. काही ठिकाणी असे आढळून आले की, काही गोर गरीब आपल्या गावावरून काही कामानिमित्त आले. त्यांना कर्फ्युची माहिती नव्हती आज जायला निघाले परंतु गाडी नसल्याने ते रस्त्याच्या कडेला बसून आहेत, खायला काही मिळते का पाहायला गेले तर दुकाने बंद आहेत. स्वामी फाऊंडेशनचे कदम यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यांना फळे नेऊन दिली आहेत. तसेच अशा जेवणाची सोय ही केली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने आदल्या दिवशीच 250 किलो फळे, 200 किलो संत्री, 300 किलो कलिंगड, 300 बिस्कीट पुडे, 100 डझन केली, 50 बॉक्स पाणीच्या बाटली आणून ठेवल्या.
भारतभर जनता कर्फ्यूमुळे दुकानं बंद; स्वामी फाऊंडेशनकडून फळे, पाणी, बिस्किटची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 5:00 PM