शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या गोखले रोडवरील दुकानदारांनी मोटरसायकल बॅटरी चोरास रंगेहात पकडले

By सुरेश लोखंडे | Updated: January 21, 2018 14:50 IST

एकाने मानगुटी पकडून त्यांची बँग हिसकवून चाचपणी केली असता त्यात दोन मोटारसायकलच्या बॅट-या आढळून आल्या. उभ्या उभ्या बॅटरी काढून त्यांची चोरी करण्याचा त्याचा हातखंड असल्याचे प्रत्यक्ष दर्शींच्या निदर्शनात आले आणि त्यास चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देउभ्या मोटरसायकलच्या बॅट-यां काढून त्यांची चोरीजमलेल्यापैकी बहुतेक जण त्याला नौपाडा पोलिसात देण्याची अपेक्षा व्यक्त करीतदरम्यान त्यास सोडून दिल्याचे प्रत्यक्ष दर्शींकडून सांगण्यात आले

ठाणे : उभ्या केलेल्या मोटरसायकलच्या बॅटरी चोरास  नौपाड्याच्या गोखले रोडवरील दुकानदारांनी रविवारी रंगेहात पकडले. यावेळी त्यांच्या बँगेत चोरलेल्या दोन बॅट-यांसह त्याचे कपडे आढळून आले. यामुळे रस्त्या लगत उभ्या मोटरसायकलच्या बॅट-यां काढून त्यांची चोरी तो  करीत असल्याचे निदर्शनात आले.गोखले रोडवरील कला निकेतन या दुकानाच्या परिसरात उभ्या असलेल्या मोटरसायकलची टेहळणी करताना एक २२ वर्षीय तरूण आढळून आला. मोटारसायकल जवळ ब-याच वेळेपासून उभा असलेल्या या तरूणाच्या हालचाली काचेतून दुकानदार महिलेने न्याहाळल्या. त्या संशयास्पद दिसून येत असल्यामुळे त्यांनी सहका-याच्या निदर्शनात आणून दिल्या. त्यानंतर जवळ जाऊन त्याची विचारपूस करताच तो दचकला आणि जाण्याच्या तयारी होता. एवढयात एकाने मानगुटी पकडून त्यांची बँग हिसकवून चाचपणी केली असता त्यात दोन मोटारसायकलच्या बॅट-या आढळून आल्या. उभ्या उभ्या बॅटरी काढून त्यांची चोरी करण्याचा त्याचा हातखंड असल्याचे प्रत्यक्ष दर्शींच्या निदर्शनात आले आणि त्यास चांगलेच धारेवर धरले.या बॅट-या कोणत्या गाड्यांच्या काढल्या, अशी विचारणा त्यास केली असता येथील गाड्यांच्या नसून दुस-या ठिकाणाहून त्या आणल्याची कबुली त्याने दिली. यावेळी जमलेल्यापैकी बहुतेक जण त्याला नौपाडा पोलिसात देण्याची अपेक्षा व्यक्त करीत होता. दरम्यान त्याची विचारपासून सुरू असताना नाहक मनस्ताप नको म्हणून काही जण त्यास सोडून देण्या विषयी चर्चा करीत असल्याचे आढळून आले. दरम्यान त्यास सोडून दिल्याचे प्रत्यक्ष दर्शींकडून सांगण्यात आले. त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले असते तर अन्य ठिकाणच्या चोरी विषयी दागेदोरेद सापडले असते, असे काही जणांकडून ऐकायला मिळाले.........

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा