शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

दुकानदारांनी हडपले पदपथ

By admin | Updated: January 14, 2017 06:30 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यात अयशस्वी ठरले असतानाच या परिसरातील

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यात अयशस्वी ठरले असतानाच या परिसरातील दुकानदारांकडून पदपथांवर होणाऱ्या अतिक्रमणांकडेही महापालिकेचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाचा त्याकडे होत असलेला कानाडोळा पाहता ‘मस्त चाललंय आमचं’, असे चित्र दुकानदारांच्या बाबतीत दिसून येते. सामानांच्या अतिक्रमणाने पदपथ व्यापल्याने सांगा चालायचे कोठून, असा प्रश्न पादचाऱ्यांना पडला आहे.फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रेल्वे स्थानक परिसरातील गर्दी व अतिक्रमणांतून वाट काढणे त्यांच्यासाठी जिकिरीचे होऊन बसले आहे. दुसरीकडे वाहतुकीवर परिणाम होऊन चालकांनाही कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सर्रासपणे कल्याण-डोंबिवलीत पाहावयास मिळते. फेरीवाला, अतिक्रमणविरोधी कारवाईवर लाखो रुपये महापालिकेचे खर्च होत असताना दिवसागणिक वाढणारी फेरीवाल्यांची संख्या प्रशासनाच्या कृतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. दिखाऊ कारवाईमुळे फेरीवाल्यांचे फावले असताना दुकानदारही यात मागे नाहीत. दुकानातील अतिरिक्त सामान बिनदिक्कतपणे पदपथावर मांडले जात आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांचे, तर पदपथावर दुकानदारांचे अतिक्रमण,असे चित्र पाहावयास मिळत असल्याने यातून नागरिकांना वाट काढणे जिकिरीचे होऊन बसले आहे. डोंबिवली कडील रेल्वे स्थानकानजीकच्या नेहरू रोडवरील दुकानदारांनी पदपथ बळकवताना त्यावर शेड टाकून मालाची विक्री सुरू केली होती. शेड व वाढीव बांधकामे दोन दिवसांपूर्वी केडीएमसीने तोडली. ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयांनी केलेल्या या कारवाईत ५४ दुकानांवरील वाढीव शेड तोडण्यात आल्या. स्वाती सिंगासने आणि स्वाती गरूड या प्रभाग अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई झाली. शेडवर कारवाई झाल्यानंतर दुकानदारांनी शटरच्या आतील जागेचाच वापर करणे बंधकारक आहे. मात्र, दुकानदार आजही पदपथावरच सामान मांडून त्याची विक्री करताना दिसतात. त्यामुळे त्यांनी पदपथ गिळंकृत केल्याचे नेहरू रोडवर सर्रास दिसत आहे. रस्त्यावरील फेरीवाले हटवण्यात असमर्थ ठरलेल्या अधिकाऱ्यांनी पदपथावरील अतिक्रमणांकडे तरी गांभीर्याने लक्ष घालावे, जेणेकरून त्यावरून तरी चालणे सोयीस्कर ठरेल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)