शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खारबावमध्ये पिस्टल बाळगणाऱ्यासह विक्रेत्यासही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:33 IST

भिवंडी : तालुक्यातील खारबाव गावात पिस्टल बाळगणारा व पिस्टलची विक्री करणाºयास पोलीसांनी अटक केली असुन त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ...

ठळक मुद्दे खारबाव पेट्रोल पंपाजवळ पिस्टलासह तरूणास अटक पिस्टल विकणा-या तरूणास खारबाव फाटकाजवळ अटकखारबावमध्ये पुर्वी दोघांना पिस्टल व काडतूसासह केली अटक

भिवंडी: तालुक्यातील खारबाव गावात पिस्टल बाळगणारा व पिस्टलची विक्री करणाºयास पोलीसांनी अटक केली असुन त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश भिवंडी कोर्टाने दिले आहेत. गेल्या बारा दिवसांत पोलीसांनी बेकायदेशीर पिस्टल बाळगणाºया तीन जणांना खारबाव गावातून अटक केल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.खारबाव मधील पेट्रोल पंपाजवळ गावातील अभिजीत हरिश्चंद्र पाटील (२१)हा गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची खबर पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे मॅगझीनने भरलेली एक लोखंडी पिस्टल व एक काडतूस मिळाले. पोलीसांनी काडतूसासह पिस्टल जप्त केले. पिस्टल प्रकरणी पोलीसांंनी तपास केला असता ही पिस्टल अनिल सुभाष जाधव याच्याकडून विकत घेतल्याचे आढळून आले. अनिल जाधव (२२) हा खारबाव रेल्वे फाटकाजवळ रहात होता.त्यास पोलीसांनी रविवारी अटक केली आहे. तो मुळचा धुळे जिल्ह्यातील जुनी सांगवी येथे रहाणारा आहे. या दोघांना सोमवारी रोजी भिवंडी कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोघांना बुधवार २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील आरोपी अभिजीत पाटील हा शिक्षण घेत असुन अनिल जाधव हा इलेक्ट्रीकशियन आहे.यापुर्वी पोलीसांनी खारबाव गावातून सतीश सुभाष दुभलकर (२२)व ऋ षिकेश अरूण काठे(२२)या दोन तरूणांना अटक केली आहे. ते खारबाव गावातील रहाणारे आहेत. सतीश हा व्यवसायाने मॅकेनिक असून त्याचा साथीदार ऋषिकेश हा त्याच्याबरोबर मदतीला होता. खारबाव गावातील चायनिजच्या गाडीवर ते दोघे येणार असल्याची खबर येणार असल्याची खबर मिळाल्यानुसार पोलीसांनी सापळा लावून त्यांना ५ नोव्हेंबर सोमवार रोजी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी पिस्टलासह ११ काडतूसे पोलीसांनी जप्त केली आहेत. लागोपाठ झालेल्या या घटनेने परिसरांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाने पो.हवा.प्रशांत बडगे,पो.ना.अनिल महाजन,पो.ना.कैलास वाढविंदे,पो.कॉ.जयेश मुकादम या पथकाने कामगिरी बजावली.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी