ठाणे : संस्कृती प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात शोले या चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मानवंदना देण्यात आली होती. यंदाची दहीहंडी ची थीमच शोले चित्रपटाची होती. यानिमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहीहंडीच्या मंचावर शोले चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना आमंत्रित केले होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित झाले. फडणवीस यांच्या हस्ते सिप्पी यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार झाल्यानंतर पन्नास वर्षानंतर ही शोले चित्रपटाचे संवाद आम्हाला आजही आठवतात असे फडणवीस म्हणाले. त्यानंतर दोघांमध्ये शोले च्या डायलॉग बाजीची जुगलबंदी रंगली.
शोले चित्रपटाची आठवण काढताना फडणवीस म्हणाले की, आम्ही आजही विचारतो कितने आदमी थे? यावर फडणवीस यांच्या हातातिल माइक घेऊन रमेश सिप्पी यावरती माहित हातात घेऊन सिप्पी म्हणाले की, तेरा क्या होगा कालिया? त्यावर फडणवीस म्हणाले की सरदार मैने आपका नमक खाया है. या डायलॉगबाजी नंतर मंचावर उपस्थित लोकप्रतिनिधी जोरजोरात हसू लागले.