लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी दुचाकीवरुन गेलेल्या निकीता गुरुलिंग जंगम (२२) या तरुणीचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणारी अक्षता प्रकाश जंगम (२५) आणि तिची मावस बहिण निकीता या एकाच मोटारसायकलवरुन ६ जानेवारी रोजी रात्री ठाण्यातील घोडबंदर रोड येथील आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या होत्या. वाढदिवस साजरा करुन त्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील पूर्व द्रूतगती मार्गावरुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरुन ऐरोलीकडे घरी परतत होत्या. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालविणारी अक्षता किरकोळ जखमी झाली. तर मावस बहिण निकीता ही गंभीर जखमी झाली. तिला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खामगळ हे अधिक तपास करीत आहेत.
धक्कादायक! ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणीचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 23:19 IST
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी दुचाकीवरुन गेलेल्या निकीता गुरुलिंग जंगम ...
धक्कादायक! ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणीचा मृत्यु
ठळक मुद्देमैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी बेतली जीवावर ट्रक चालक पसार