शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

धक्कादायक! परिस्थितीपुढे हतबल झाल्याने तान्हुलीला तिने फेकले रस्त्यावर!

By जितेंद्र कालेकर | Updated: October 13, 2020 00:02 IST

एकीकडे पतीने सोडले. तर दुसरीकडे कोरोनामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे स्वत:ची खासगी नोकरीही गेली. मग जन्मास घातलेल्या मुलीचा सांभाळ कसा करायचा? या आर्थिक विवंचनेतूनच आपल्या अवघ्या चार दिवसांच्या मुलीला खारीगाव येथील मोकळया जागेत एका महिलेने फेकून दिले. कळवा पोलिसांनी कोणताही धागादोरा नसतांना अवघ्या काही तासांमध्येच या २४ वर्षीय महिलेला अटक केली.

ठळक मुद्देकळव्यातील घटनाअवघ्या १२ तासांमध्ये कळवा पोलिसांनी घेतला मातेचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे पतीने सोडले. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे स्वत:ची नोकरीही गेली. मग जन्मास घातलेल्या मुलीचा सांभाळ कसा करायचा? या विवंचनेतूनच आपल्या जिवंत मुलीला खारीगाव येथील मोकळया जागेत फेकून देणाऱ्या २४ वर्षीय महिलेचा कळवा पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच शोध घेतल्याची घटना सोमवारी घडली. तिच्या मुलीवर आता उपचार करण्यात येत आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ११ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कळवा पूर्व भागातील खारीगाव रेल्वे फाटकाच्या बाजूला असलेल्या उड्डाणपूलाजवळील मोकळया मैदानामध्ये एक सहा ते सात दिवसांची नवजात मुलगी पोलिसांना आढळून आली. सुरुवातीला कोणीतरी अनैतिक प्रकारातून या मुलीला टाकून दिल्याचा संशय होता. त्यामुळे याप्रकरणी कलम ३१७ नुसार अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर, पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिरसाठ यांच्या पथकाने कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून मिळालेल्या वर्णनाच्या आधारे परिसरातील अनेक महिलांकडे या नवजात मुलीची चौकशी केली. तेंव्हा डॉक्टरांकडून मिळालेल्या वर्णनाच्या आधारे कळवा परिसरातील एका २४ वर्षीय महिलेचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. वर्षभरापूर्वी एका २७ वर्षीय तरुणाबरोबर पळून जाऊन प्रेमविवाह केला. झारखंडला त्याच्याबरोबर काही महिने राहिल्यानंतर ती गरोदर राहिली. दरम्यान, त्यांच्यात काही कारणांनी वाद झाले. याच वादामुळे त्याने तिला सोडले. दोन महिन्यांपूर्वीच ती कळव्यात पुन्हा आईकडे आली. ८ आॅक्टोंबर रोजी तिने एका मुलीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जन्मही दिला. परंतू, पतीनेही सोडले. त्यात स्वत:चीही वसई येथील खासगी नोकरी लॉकडाऊनमुळे गेली. आता या मुलीचा सांभाळ तरी कसा करायचा? त्यामुळेच तिला एका मोकळया मैदानात टाकल्याची कबूली तिने पोलिसांपुढे दिली. या प्रकरणात पोलिसांनी तिला सोमवारी अटक केली असून तिची कौटुंबिक परिस्थिती जाणून घेतल्यानंतर ठाणे न्यायालयानेही तिची जामीनावर सुटका केली आहे. कोणताही धागादोरा नसतांना केवळ डॉक्टरांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे कळवा पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला. तिच्या नवजात बाळाला आता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक