शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाणे शहरात २४ तासांमध्ये दोघांच्या सोनसाखळयांची जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:25 IST

ठाण्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच आता सोनसाखळी चोरटयांनीही डोके वर काढले आहे. अवघ्या २४ तासांमध्येच एका महिलेसह दोघांच्या सोनसाखळया जबरीने हिसकावल्याच्या घटना शहरातील वेगवेगळया भागांमध्ये घडल्या. नाकाबंदीमधील पोलिसांची संख्या कमी झाल्यामुळे आता या घटनांमध्येही वाढ होऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देचोरटयांचेही संपले ‘लॉकडाऊन’नाकाबंदीमधील पोलिसांची संख्या कमी झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेली नाकाबंदी आता अनेक ठिकाणी शिथिल झाली आहे. याचाच फायदा घेत चोरटयांनीही त्यांचे लॉकडाऊन संपविले असून अवघ्या २४ तासांच्या अंतरामध्ये ठाणे शहरात एका महिलेसह दोघांच्या सोनसाखळया लांबविल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी वर्तकनगर आणि नौपाडा या दोन पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरीच्या गुन्हयांची नोंद शनिवारी आणि रविवारी झाली आहे.गेली सुमारे अडीच महिने सुरु असलेली संचारबंदी शिथिल झाली आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोनमधील काही तुरळक पोलीस आणि राज्य राखीव दलाचे पोलीस वगळता अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदीचे पॉईन्ट कमी केले आहेत. एरव्ही, नाकाबंदी आणि गस्तीचे प्रमाण अधिक असल्यामुळे सोनसाखळी चोरटे चोरीसाठी धजावत नव्हते. आता रस्त्यावरील पोलिसांची संख्या कमी होताच हे गुन्हेही दाखल होऊ लागले आहेत. देवदयानगर येथील रहिवाशी संतोष जोशी (४८) हे २१ जून रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर येथील साई मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी पायी जात होते. शास्त्रीनगर येथे ते आले असता, मोटारसायकलवरुन तोंडाला मास्क लावून आलेल्या ३० ते ३५ वयोगटातील दोघांपैकी त्यांच्या गळयातील ५० हजारांची २० ग्रॅमची सोनसाखळी आणि दुसरी एक ४० हजारांची सोनसाखळी खेचून पलायन केले. याप्रकरणी त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याआधी स्मिता ठकार (५४, रा. पाचपाखाडी, ठाणे) ही महिला २० जून रोजी सकाळी ६ वा. च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली. ती ठाणे महापालिका मुख्य कार्यालयाजवळील संत ज्ञानेश्वर मार्गावरुन घरी जात असतांना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा भामटयांनी त्यांचे ३५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. याप्रकरणी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीची तक्रार दाखल केली आहे.* एक आठवडयापूर्वी राबोडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या साकेत मार्गावरही एका सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या महिला अधिकाºयाचीच सोनसाखळी खेचण्याचा दोघ्रांनी प्रयत्न केला होता. त्यानंतर या दोन घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :thaneठाणेRobberyचोरीtheftचोरी