लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: माजीवडा येथून कल्याणकडे जाणाºया एका रुग्णवाहिकेने एका मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये बाळू कोळी (२९, रा. नांदिवली, कल्याण) याच्यासह दोघे मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. रुग्णवाहिकेचा चाल निलेश पावसकर (३२, रा. विरार) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कोळी हा त्याच्या मित्रासह १८ एप्रिल रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर ते ठाणे या मार्गावरुन माजीवडा येथून कल्याणकडे जात होते. त्याचवेळी घोडबंदर रोडने ठाण्याकडे जाणाºया मार्गावरुन पावसकर यांची रुग्णवाहिका भरघाव वेगाने आली. भन्नाट वेगात असलेल्या या रुग्णवाहिकेची धडक या मोटारसायकलला बसल्याने कोळी याच्यासह दोघेही जण खाली पडून जखमी झाले. यात मोटारयाकलचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले. रविवारी पहाटेच्या सुमारास याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार एस. जी. मते याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
धक्कादायक! ठाण्यात रुग्णवाहिकेच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 21:50 IST
ठाण्यातून कल्याणकडे जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेने एका मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये बाळू कोळी याच्यासह दोघे मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
धक्कादायक! ठाण्यात रुग्णवाहिकेच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार जखमी
ठळक मुद्देचालकाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हामोटारसायकलीचेही नुकसान