शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

धक्कादायक! ठाण्यात ट्रकच्या धडकेने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 21:56 IST

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील तीनहातनाका उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने ट्रकने दिलेल्या धडकेत प्रतीक गणत्रा आणि प्रशांत घाडगे या मुलूंड येथील दोन मित्रांचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. अपघातानंतर ट्रक चालकाला नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देट्रकचालकास अटकनौपाडा पोलिसांनी केला ट्रक जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई-अहमदाबाद पूर्व द्रुतगती मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तीनहातनाका येथील उड्डाणपुलावर एका मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत प्रतीक गणत्रा (२३, रा. मुलुंड) आणि प्रशांत घाडगे (२२, रा. मुलुंड) यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.२५ वाजता घडली. याप्रकरणी ट्रकचालक मुकेशकुमार पटेल (३०, रा. वैजलपूर, गुजरात) याला नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली.प्रतीक आणि प्रशांत हे दोघे २३ जानेवारीला रात्री ९.३० वाजता मोटारसायकलवरून ठाण्यात आले होते. मुंबई-नाशिक मार्गावरून तीनहातनाका येथील उड्डाणपुलावरून जात असताना भरधाव वेगाने जाणाºया पटेल याच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांच्या पथकाने तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात या दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पटेल याला २४ जानेवारीला पहाटे २ वाजता अटक केली. त्याचा ट्रकही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात