शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात दोन वर्षांत २३ लाखांची वीजचोरी करणा-या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 21:06 IST

गेल्या दोन वर्षांपासून मीटरमध्ये फेरफार करुन तब्बल एक लाख १९ हजार ६७७ युनिटची चोरी करून २३ लाख दोन हजार २३८ रुपयांची वीजचोरी करणा-या कनोज उतेकर आणि निलेश उपाले या दोघांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देफिरत्या भरारी पथकाची कारवाई वीजमीटरमध्ये केला फेरफारनौपाडा पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेल्या दोन वर्षांमध्ये विजेचा अनधिकृतपणे वापर करून एक लाख १९ हजार ६७७ युनिटची चोरी करून २३ लाख दोन हजार २३८ रुपयांची वीजचोरी करणा-या कनोज उतेकर आणि निलेश उपाले या दोघांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीमध्ये अनियमितता आढळल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाकंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील गडकरी उपविभागाचे सहायक अभियंता हेमंत चौरे आणि माधुरी देशमुख हे आपल्या पथकासह ३१ आॅगस्ट २०१९ रोजी वीजमीटर बदलण्याच्या कामासाठी ‘मोनालिसा को-आॅपरेटिव्ह सोसायटी’मध्ये गेले. तिथे दीप प्रॉपर्टीज डेव्हलपर्स आणि इन्फ्रास (बॉडीटॉक जिम) चे मालक उतेकर आणि उपाले यांचे मीटर बदलण्याची त्यांनी कार्यवाही केली. त्यावेळी त्यांच्या वीजमीटरचे सील योग्य स्थितीमध्ये नसल्याचे आढळले. ही बाब संबंधित ग्राहकांच्याही निदर्शनास आणून ते मीटर सील करून तपासणीसाठी ठाण्याच्या चाचणी विभागात पाठविण्यात आले. त्यानंतर, २६ सप्टेंबर २०१९ रोजी संबंधित ग्राहकांच्या समोरच त्याची चाचणी केली. तेव्हा, या मीटरमध्ये खोडसाळपणे टॅम्पर केल्याचे आढळले. या मीटरमध्ये ६५ टककयांपेक्षा कमी रीडिंग होत होते. ३० सप्टेंबर रोजी हे मीटर फिरते पथक यांच्या कार्यालयात पंच आणि ग्राहकांसमोर उघडण्यात आले. या तपासणीतही ग्राहकाने एक्सटर्नल सर्किट हे या मीटरच्या हिरव्या रंगाच्या पीसीबीला जोडल्याचे उघड झाले. त्यामुळेच हे मीटर ६५ टक्के कमी रीडिंग वाचन करीत होते. या पाहणीमध्ये आढळलेल्या अनियमिततेच्या आधारावर याठिकाणचा वीजपुरवठा भरारी पथकाने खंडित केला. त्यानंतर, २३ लाखांच्या वीजचोरीप्रकरणी उतेकर आणि उपाले या दोघांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्यांतर्गत १४ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी