शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! स्वत:च्याच अल्पवयीन मुलाशी पिता करायचा अश्लील चाळे

By जितेंद्र कालेकर | Updated: January 15, 2019 20:49 IST

आपल्याच चार वर्षीय मुलाशी गेल्या तीन वर्षांपासून अश्लील चाळे करणाऱ्या ४५ वर्षीय पित्याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्या घृणास्पद चाळयांचे पत्नीने चित्रीकरण करुन ते पोलिसांना दाखवून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

ठळक मुद्देठाण्याच्या वडवलीतील घटना पत्नीच्या तक्रारीनंतर पित्याला केली अटककासारवडवली पोलिसांची कारवाई

ठाणे: अवघ्या चार वर्षांच्या मुलाशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी वडवली गावातील एका ४५ वर्षीय पित्याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.वडवली गावात राहणा-या एका दाम्पत्याला एकूलता एक चार वर्षांचा मुलगा आहे. त्याच्याशी त्याचा हा पिता गेल्या दोन वर्षांपासून अश्लील वर्तन करीत होता. घरात त्याच्यासमोर विवस्त्र वावरणे, त्याच्याशी विवस्त्र आंघोळ करणे यासह अनेक घृणास्पद प्रकार तो करीत होता. या प्रकाराला त्याच्या पत्नीने आक्षेप घेतल्यानंतर तिलाला त्याने जुमानले नाही. आधी मीरा रोड भागात ते वास्तव्याला होते. अलिकडेच ते वडवली भागात वास्तव्याला आले होते. त्याच्या या प्रकाराला कंटाळून पत्नीने कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि सहायक पोलीस निरीक्षक शीतल चौगुले यांच्या पथकाने त्याला अटक केली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हा