शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात मृताचा दाखला मिळविण्यासाठी मृतदेहाला घेऊन पोलिसांची सहा तास भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 21:02 IST

कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन जसे विस्कळीत झाले आहे. तसे मृत्युनंतरही एखाद्या व्यक्तीचा दाखला मिळणे कसे अवघड झाले आहे, याची प्रचिती ठाण्यातील पोलिसांना सोमवारी आली. या घटनेने संताप आणि हळहळही व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा असाही इफेक्टठाण्यातील धक्कादायक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनामुळे पोलीस, डॉक्टर आणि नागरिकांमध्येही चांगलेच भीतीचे वातावरण आहे. सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या एका युवकाच्या मृतदेहालाही याचा फटका बसला. डॉक्टरांकडून तो मृत असल्याचा दाखला मिळण्यासाठी त्या मतृदेहाला जिल्हा सामान्य रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्यामुळे मृत्युनंतरही या मृतदेहाची तब्बल सहा तास अवहेलना झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हावरे सिटी भागातील आदिवासी पाडा परिसरात आकाश जाधव याने झाडाला रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. चितळसर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तो मृत आहे की नाही यासाठी त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, हे रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तेथील सुरक्षा रक्षकांनी रु ग्णालयाच्या बाहेरच रु ग्णवाहिकेला थांबविले. मृतदेहासोबत असलेल्या पोलिसांनी पंचनामा दाखवूनही डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी करण्यास नकार दिला. त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यास सांगितले. पोलिसांनी तिथे संपर्क केला असता त्यांनीही या युवकाला तपासून तो मृत आहे की नाही, याचा दाखला देण्यास नकार दिला. दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत पोलीस हा मृतदेह घेऊन फिरत होते. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणली. तेंव्हा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गळफास घेतलेल्या युवकाला तपासून तो मृत असल्याचा दाखल दिला. अखेर सहा तास दाखल्यासाठी भटकंती करीत असलेल्या या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंकार करण्यात आले.* लोकमान्यनगर भागातील ५५ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युनंतर दुस-या दिवशी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. या घटनेनंतर सुमारे ११४ लोकांना कॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या तपासणीला रुग्णालयाकडून विलंब झाल्याची शक्यता एका पोलीस अधिकाºयाने व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस