शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

धक्कादायक ! मुलांच्या क्रिकेट खेळण्यातून एकाने केला दुसऱ्या पालकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 21:10 IST

अवघ्या पाच वर्षीय मुलांमध्ये खेळण्यातून झालेल्या वादाचे पडसाद त्यांच्या पालकांमध्ये उमटले. या दोन्ही मुलांच्या पालकांपैकी सियाराम तिवारी (४४) यांच्यावर अतुल द्विवेदी (३३) याने हल्ला केला. या हल्ल्यात तिवारी यांच्या कानाला त्यांनी चावा घेतल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देकान कुरतडून खांद्यालाही घेतला चावाठाण्यातील कोलशेत वरचा गाव येथील घटनाकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुलांच्या क्रिकेट खेळण्याचा वाद पालकांपर्यंत गेल्यामुळे सियाराम तिवारी (४४, रा. मरीआईनगर, कोलशेत वरचा गाव, ठाणे) यांना अतुल द्विवेदी (३३, रा. मरीआईनगर, ठाणे) याने यांच्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी द्विवेदी यांच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोलशेत वरचा गाव भागातील रिक्षा चालक तिवारी यांचा मुलगा अंश (५) आणि त्यांच्या घरासमोरील रहिवाशी द्वीवेदी यांचा मुलगा अनमोल (५) हे दोघेही १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बॉल बॅट खेळत होते. त्यावेळी अचानक त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. हा वाद सोडविण्यासाठी तिवारी यांचा मोठा मुलगा आदित्य (१४) आणि मुलगी उन्नती (१३) हे दोघेजण तिथे गेले. त्यावेळी अतुल यांच्या भावाने तिवारी यांच्या मुलांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या मारहाणीमुळे उन्नतीने केलेली आरडाओरड ऐकून तिचे वडिल सियाराम तिवारी यांनी तिथे धाव घेत भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा द्विवेदी यांनी तिवारी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या धुमश्चक्रीत द्विवेदी यांनी तिवारी यांना उखाली पाडून त्यांच्या अंगावर बसून त्यांचा उजव्या कानाला चावा घेत तो कुरतडला. तसेच डाव्या खांद्यालाही त्यांनी चावा घेतला. यात ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पत्नीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी तिवारी यांनी द्वीवेदीविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस