शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात दुधाच्या टेम्पोच्या धडकेमध्ये मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 22:27 IST

टेम्पोने दिलेल्या धडकेमुळे जॉन श्रीसुंदर (३४) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास कॅडबरी जंक्शन येथे घडली.

ठळक मुद्देटेम्पो चालकास अटकनौपाडा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : टेम्पोच्या धडकेत जॉन सायमन श्रीेसुंदर (३४, रा. शेलारपाडा, कोलबाड, ठाणे) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी टेम्पोचालक नबीसाहब महंमद मुल्ला मोहंमद मुल्ला (२९, रा. सानपाडा, नवी मुंबई, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.जॉन हे त्यांच्या मोटारसायकलने १६ फेब्रुवारी रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई ते नाशिकच्या दिशेने पूर्व द्रुतगती मार्गावरून जात होते. त्याचवेळी मुल्ला याचा दुधाचा टेम्पो खोपट बाजूकडून वर्तकनगरच्या दिशेला जात असताना जॉन यांच्या मोटारसायकलला कॅडबरी जंक्शनजवळ जोरदार धडक बसली. या धडकेमध्ये टेम्पोच्या चाकाखाली येऊन जॉन गंभीर जखमी झाले. त्यांना नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.पी. सोनवणे, मिलिंद मोरे आणि धुरी यांनी तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी त्याच्या पॅण्टच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डच्या आधारे ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. तत्पूर्वी, त्याच्या मृतदेहाची जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. टेम्पोचालक नवीसाहब याच्याविरुद्ध कलम २७९ आणि ३०४- अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनावणे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात