शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक: ठाण्यात चोरटयांनीही सुरु केले मिशन बिगीन अगेन;  सोनसाखळी हिसकावून दोघांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 00:47 IST

चोरटयांनीही ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. घोडबंदर रोड भागात पातलीपाडा ब्रिजकडे जाणा-या रस्त्यावरुन ‘मॉर्निंग वॉक’ करणा-या महेश पणीकर (४८, रा. चेंबूर, मुंबई) यांची सोनसाखळी जबरीने हिसकावून दोघांनी पलायन केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एक लाखांची सोनसाखळी हिसकावली

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: एकीकडे लॉकडाऊन शिथिल होत असतांना चोरटयांनीही ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. घोडबंदर रोड भागात पातलीपाडा ब्रिजकडे जाणा-या रस्त्यावरुन ‘मॉर्निंग वॉक’ करणा-या महेश पणीकर (४८, रा. चेंबूर, मुंबई) यांची सोनसाखळी जबरीने हिसकावून दोघांनी पलायन केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरटयांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.कासारवडवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश हे १९ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांचे मेहुणे टोझी थॉमस यांच्यासमवेत हिरानंदानीकडून पातलीपाडा बाजूकडे जाणा-या रस्त्यावर मॉर्निंग वॉक करीत होते. त्याचवेळी एका मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांची ४० ग्रॅम वजनाची एक लाखांची सोनसाखळी झटका देऊन जबरीने हिसकावून नेली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांनी जबरी चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक के. व्ही. मोरे हे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी