शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नाला नकार दिल्याने पाकिस्तानातील मित्राच्या मदतीने प्रेयसीला खंडणीची धमकी देणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 20:12 IST

पाकिस्तानातील फेसबुकवरील मित्राच्या मदतीने ठाण्यातील पूर्वाश्रमीच्या प्रेयसिला तिच्याबरोबर काढलेल्या फोटोंच्या आधारे एक लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाºया भिवंडीतील परमेश भैरी या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ठळक मुद्देठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईअवघ्या ४८ तासात केले जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लग्नास नकार दिल्याने आपल्याच प्रेयसिला पाकिस्तानातील मित्राच्या मोबाईल क्रमांकावरुन एक लाखांच्या खंडणीची धमकी देणा-या परमेश मनोहर भैरी (28, रा. भिवंडी, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे. प्रेमसंबंधाचे चित्रण असलेला पेनड्राईव्ह गहाळ झाल्याचा बहाणा करीत पूर्वाश्रमीच्या पे्रयसीसह तिच्या भावाला खंडणीसाठी तो धमकावित होता. त्याला आता वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.आपल्या प्रेयसिने लग्नाला नकार दिला असून तिचे मार्च मध्ये दुस-याशीच लग्न होणार होते. पण ते सध्याच्या लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडले आहे, अशी माहिती परमेश भैरी याने त्याच्या फेसबुकवरील पाकिस्तानातील मुशरफ या मित्राला दिली. मैत्रिणीबरोबरचे काही अश्लील फोटोही परमेशने त्या मित्राला पाठविले. नंतर तिचा आणि तिच्या भावाचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांना त्याच फोटोंच्या आधारे त्याने पाकिस्तानमधील मोबाईलवरुन एक लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिली. हे एक लाख रुपये दिले नाहीतर मात्र तुझे फोटो व्हायरल करील, अशी धमकीही त्याने दिली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात पिडीत तरुणीने अज्ञात आरोपीविरुद्ध ४ मे रोजी तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल केल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी परमेशकडे चौकशी केली तेंव्हा त्याने आपण त्या गावचेच नसल्याचा आव आणला. आपल्यालाही अशीच धमकी आल्याचा दावा करीत या फोनशी आपला संबंध नसल्याचा त्याने कांगावा केला. नंतर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस नाईक प्रशांत बुडके, रोशन जाधव आणि नितीन ओवळेकर आदींच्या पथकाने त्याला भिवंडीतून ६ एप्रिल रोजी दुपारी ताब्यात घेतले. त्यांनाही त्याने तशीच कहीणी ऐकवून आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, त्याचा फोनमधील एक एक पाकिस्तानी क्रमांक आणि या तरुणीला धमकी देणारा पाकिस्तानी क्रमांक यांच्यात साम्यता आढळल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्यानंतर तिने लग्नाला नकार दिल्यामुळे आपण पाकिस्तानातील फेसबुकवरील मित्रालाच तिचा आणि तिच्या नातेवाईकांचा फोन क्रमांक देऊन त्याला धमकी देण्यास सांगितल्याची कबूली दिली. त्याला आता वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस निरीक्षक रमेश जाधव याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.* असा घडला होता प्रकारभूतकाळात यातील फिर्यादी तरुणीने प्रियकरासोबत व्यतीत केलेल्या प्रेमसंबंधाचे चित्रण असलेला पेन ड्राइव्ह अन्य एका व्यक्तीच्या हाती लागला. आता याच पेनड्राइव्हच्या आधारे ब्लॅकमेल करीत तिच्याकडून एक लाखांची खंडणीची मागणी परमेश भैरी याने पाकिस्तानच्या मित्राच्या मार्फतीने मागितली होती. पाकिस्तानातील फोनवरील मित्राला ठाणे पोलीस पकडू शकणार नाहीत, अशा भ्रमात असल्यामुळेच त्याने ही शक्कल लढविली. मात्र खंडणी विरोधी पथकाने कौशल्याने केलेल्या तपासात तो अडकला आणि पकडला गेला.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसExtortionखंडणी