लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कपडे आण िमोबाइल घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून संतप्त झालेल्या नासीर शेख (45, रा. कासारवडवली, ठाणे) याने पत्नी फरीदा (45) हिला जबर मारहाण करून नंतर तिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील कासारवडवली गावात बुधवारी रात्री घडला. याप्रकरणी नासीरला कासारवडवली पोलिसांनी गुरु वारी अटक केली.या घटनेमध्ये होरपळलेल्या फरीदाला उपचारासाठी मुंबईतील लोकमान्य टिळक रु ग्णालयात दाखल केले आहे. फरीदा ही पती नासीर याच्यासह ठाण्यातील घोडबंदर रोडवरील, कासारवडवली गाव येथे भाडेतत्त्वावर गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्याला आहे. स्वयंपाकी असलेला नासीर मिळेल तिथे स्वयंपाकी म्हणून काम करतो. तर फरीदा मात्र गृहिणी आहे. 7 एिप्रल रोजी रात्री 10.20 वाजण्याच्या सुमारास नासीर घरी आला. त्याने पत्नी फरीदाकडे कपडे आण िमोबाइल घेण्यासाठी काही पैसे मागितले. परंतु, पैसे नसल्याचे तिने सांगताच संतापलेल्या नासीरने तिला मारहाण करण्यास सुरु वात केली. त्यानंतर घराचे दार बंद करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला त्याने निर्दयीपणे पेटवून दिले. फरीदा पेटलेल्या अवस्थेतच दार उघडून रस्त्यावर आली असता स्थानिक रिहवाशांनी आग विझवून तिला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिथूनही तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील लोकमान्य टिळक रु ग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात पती नासीर याच्याविरु द्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
धक्कादायक! कपडे घेण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत पेटविणाऱ्या पतीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 18:38 IST
कपडे आण िमोबाइल घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून संतप्त झालेल्या नासीर शेख (45, रा. कासारवडवली, ठाणे) याने पत्नी फरीदा (45) हिला जबर मारहाण करून नंतर तिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील कासारवडवली गावात बुधवारी रात्री घडला.
धक्कादायक! कपडे घेण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत पेटविणाऱ्या पतीस अटक
ठळक मुद्दे कासारवडवली पोलिसांची कारवाईमहिलेची प्रकृती चिंताजनक