शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून १७ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:50 IST

विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्यांनी ठाण्यातील एका ४५ वर्षीय महिलेची १७ लाखांची फसवणूक केल्याची घटना अलिकडेच घडली.

ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलएनईएफटी आणि आयएमपीएसद्वारे पैसे भरणा करण्यास भाग पाडले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्यांनी ठाण्यातील एका ४५ वर्षीय महिलेची १७ लाखांची फसवणूक केल्याची घटना अलिकडेच घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.या भामट्यांनी एका खासगी विमा कंपनीचे बनावट ईमेलद्वारे तक्र ारदार ठाण्याच्या पाचपाखाडीतील महिलेशी संपर्क केला. या महिलेला एनईएफटी आणि आयएमपीएसद्वारे भरणा करण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर विमा कंपनीमध्ये संबंधित भामट्यांनी त्यांचे हे पैसे भरलेच नाही. या महिलेने काही महिन्यांपूर्वी भारती एक्स या कंपनीसह इतर कंपन्यांमध्ये पाच पॉलिसी घेतल्या होत्या. दरम्यान, २१ जून २०२० रोजी या महिलेला सुमित आहुजा नावाच्या व्यक्तीचा इमेल आला. तुमच्या पॉलिसीच्या प्लॅनमध्ये दिशाभूल झाली असल्याचे या मेलमध्ये दर्शविण्यात आले होते. त्यानंतर या ईमेलमध्ये दिलेल्या फोन क्रमांकावर या महिलेने फोनद्वारे विचारणा केली, तेव्हा या व्यक्तीने भारती एक्स कंपनीच्या सर्व्हिस डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचा दावा केला. तुमच्या जुन्या पॉलिसीऐवजी नविन पॉलिसी घेतली आहे. त्या पॉलिसीचा कालावधी वाढविला तर तुम्हाला लगेचच मोठा फायदा होऊ शकतो, असेही त्याने पटवून दिले. त्यानंतर या महिलेशी त्याने वारंवार फोनद्वारे संपर्क करुन त्यांना एनईएफटी आणि आयएमपीएसद्वारे विविध बँकांत १७ लाख रुपये भरणा करण्यास भाग पाडले. मात्र, भरणा केलेली रक्कम संबंधित विमा कंपनीस प्राप्त झाली नसल्याची बाब समोर आली. हा सर्व प्रकार २१ जून ते १६ जुलै २०२० या कालावधीत घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात २० जुलै रोजी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य