शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात मुलीला मारहाण केल्याच्या रागातून जावयाला सासऱ्यानेही केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 20:02 IST

आपल्या मुलीला जावयाकडून होत असलेली मारहाण सहन न झाल्याने अनिरुद्ध गलगली या जावयालाही त्याचे सासरे विनोद शर्मा, भाऊ नंदन शर्मा आणि भावाचा मित्र गौरव सिंग अशा तिघांनी मारहाण केली. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याने याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आपल्या सास-यासह तिघांविरुद्ध रविवारी तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देचितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलगेल्या तीन वर्षांपासूनचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आपल्या मुलीला जावयाने बेदम मारहाण केल्याच्या रागातून अनिरुद्ध गलगली (३४) या तिच्या पतीलाही सासरे, मेव्हणे आणि त्याचा मित्र अशा तिघांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी दोन्ही पती पत्नींनी एकमेकांविरुद्ध मारहाण तसेच धमकीची तक्रार चितळसर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणारी नेहा (३५) आणि वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करणारा तिचा (३४, रा. दोस्ती इम्पेरिया, मानपाडा, ठाणे) या पती पत्नींमध्ये गेल्या तीन वर्षांपासून घरगुती कारणांवरुन वाद आहेत. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. नेहमीप्रमाणेच त्यांच्यात रविवारी दुपारीही वाद झाला. याच वादातून दोघांनीही ३ मे रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एकमेकांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि धमकीच्या तक्रारी दिल्या. पती बरोबर भांडण झाल्याचे आणि त्याने मारहाण केल्याची बाब नेहाने तिच्या वडिलांना फोनवरुन सांगितली. याचाच जाब विचारण्यासाठी तिचे वडिल विनोद शर्मा, भाऊ नंदन शर्मा आणि भावाचा मित्र गौरव सिंग हे दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी पोहचले. त्यावेळी पती पत्नी नेहाला मारहाण करीत असल्याचे दृश्य त्यांना पहायला मिळाल्याने त्यांनी रागाच्या भरात त्यालाही हाताच्या ठोशा बुक्क्यांनी अनिरुद्ध गलगली याला किचनमधील स्टीलचे पातेले, ग्लास या भांडयांनी मारहाण करीत त्याला जखमी केले. त्याला शिवीगाळ करुन त्याला पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याने ३ एप्रिल रोजी रात्री चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.* अनिरुद्धने सासरच्या मंडळींनी मारहाण केल्यानंतर चितळसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप करीत आपल्या मित्र मंडळींच्या मदतीने ट्वीटरवरुन ‘सेव्ह अनिरुद्ध हॅश टॅग’ ही मोहीमही सुरु केली होती. मात्र, दोन्ही बाजूंची पडताळणी करीत याप्रकरणी कारवाई केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस