शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रेमसंबंधाच्या चित्रणाच्या आधारे ठाण्यातील तरुणीकडे एक लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 20:39 IST

एका प्रेमीयुगूलाच्या प्रेम संबंधाच्या खासगी क्षणांचे काही चित्रण आणि फोटो असलेला पेनड्राईव्ह भलत्याच व्यक्तीच्या हाताला लागला. आता या भामटयाने हीच संधी साधत या तरुणीसह तिच्या प्रियकर आणि भावाकडेही एक लाखांच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी दिली नाही तर मात्र हे फोटो व्हायरल करण्याचीही धमकी त्याने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीला परदेशातील फोनवरुन धमकी देणारा हा भामटा कोण याचा शोध आता ठाणे पोलीस घेत आहेत.

ठळक मुद्दे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलप्रियकरासोबतच्या क्षणांचे चित्रण होते पेनड्राईव्हमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एका तरुणीने भूतकाळात प्रियकरासोबत व्यतीत केलेल्या प्रेमसंबंधाचे चित्रण असलेला पेन ड्राइव्ह अन्य एका व्यक्तीच्या हाती लागला. आता याच पेनड्राइव्हच्या आधारे तिला ब्लॅकमेल करीत तिच्याकडून एक लाखांची खंडणीची मागणी करण्यात आल्याची घटना माजीवडा भागात घडली आहे. याप्रकरणी या तरुणीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.पोखरण रोड क्रमांक दोन, माजीवडा भागात राहणारी ही २९ वर्षीय तरुणी भूतकाळातील या वादग्रस्त व्हिडीओमुळे चांगलीच अडचणीत सापडली आहे.पिडीत तरु णी २०१८ मध्ये कासारवडवली येथे एका ठिकाणी नोकरीला होती. तिथेच एका सहकारी तरुणाबरोबर तिचे प्रेमसंबंध जुळले. कालांतराने भांडणे होऊन दोघेही विभक्त झाले. तिनेही कासारवडवली येथील नोकरी सोडून वर्तकनगर परिसरात नोकरी सुरु केली. अचानक एक दिवस तिच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. ‘मी तुला किती शोधले, आता सापडलीस’, असे म्हणत, त्याने तुझ्या प्रेमसंबंधाचे फोटो आणि व्हिडीओ आपल्याकडे असून एक लाख रुपये दे नाहीतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करील, अशी धमकीही त्याने दिली. हा फोन ऐकल्यानंतर धक्काच बसलेल्या या तरुणीने तिच्या पूर्वीच्या प्रियकराला फोन करून विचारणा केली. तेव्हा त्यानेही आपल्या दोघांचे चित्रणाचा पेनड्राइव्ह हरविल्याचे स्पष्ट केले. तेंव्हा तिने या प्रकाराची माहिती त्याला दिली. तिला धमकावणाऱ्याने काही फोटो तरु णीच्या भावाला आणि तिच्या गावाकडील काही जणांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले आहे. विशेष म्हणजे खंडणी दिली नाही तर पेनड्राइव्हमधील व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी या तरुणीसह तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि तिच्या भावालाही देण्यात आली आहे. २७ मार्च ते ४ मे २०२० रोजी घडलेल्या या प्रकाराची या तरुणीने ४ मे २०२० रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी खंडणीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील धमकी देणा-याचा फोन क्रमांक हा परदेशातील असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे