शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यातून बेपत्ता झालेला व्यावसायिक मिळाला चिपळूणला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 00:14 IST

लॉकडाऊनमुळे व्यवसायातून चार ते पाच लाखांचे कर्ज झाल्याने घरातून बेपत्ता झालेल्या ज्ञानेश रामप्रभू वैद्य (३२, रा. चरई, ठाणे ) याचा चिपळूण येथून शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना रविवारी यश आले.

ठळक मुद्देकर्जबाजारी झाल्याने सोडले घरनौपाडा पोलिसांनी घेतला शोध

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लॉकडाऊनमुळे व्यवसायातून चार ते पाच लाखांचे कर्ज झाल्याने घरातून बेपत्ता झालेल्या ज्ञानेश रामप्रभू वैद्य (३२, रा. चरई, ठाणे ) याचा चिपळूण येथून शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना रविवारी यश आले. तो सुखरुप घरी परतल्यामुळे कुटूंबींयानी समाधान व्यक्त केले आहे.ठाण्यातील सेंट जॉन हायस्कूलच्या बाजूला चरई येथे ज्ञानेश याचे अवधूत फॅब्रिकेटर्स हा वेल्डींगचा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्याला मित्र परिवाराकडून कर्ज घ्यावे लागले होते. आता काहींनी त्याच्याकडे कर्ज परत फेडीसाठी तगादा लावल्यामुळे तो कोणालाही काहीही न सांगता ७ जुलै २०२१ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातून अचानक बेपत्ता झाला. कुटूंबीयांनी त्याची वाट पाहून याप्रकरणी ८ जुलै रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आर. एन. आरोंदेकर आणि पोलीस नाईक किशोर काळे यांनी तांत्रिक विश्लेषण सतेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा चिपळूण येथे शोध घेतला. त्याला नातेवाईकांच्या मदतीने ११ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास चिपळूण येथील एसटी बस थांब्यासमोरुन ताब्यात घेतले. कर्जबाजारी झाल्याने आपण घर सोडल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी सखोल तपास करण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी